पंजाब: पंजाब विधानसभा निवडणूकीची (Punjab Assembly Election 2022 ) धामधूम सुरु असताना काँग्रेस पक्षात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे संस्थापक कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच्यावर काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका केली आहे. गरीब जनतेला मोफत वीज देण्याचे नाकारल्यामुळे अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. फतेहगड साहिब प्रचारादरम्यान त्यांनी हा आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी माझा वीजपुरवठा करणार्या कंपन्यांशी करार आहे असे सांगितले होते. यासाठी त्यांनी गरीब जनतेला मोफत वीज देण्याचे मान्य केले नाही आणि यामुळेच त्यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले.
पंजाबच्या विकासा विषयी बोलताना ते म्हणाले, पंजाबमध्ये विकासाचे प्रयोग व्हायला हवेत. अमली पदार्थामुळे देशाला धोका आहे. यामुळे तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. हे असेच होत राहिल्यास पंजाबमध्ये विकास आणि वाढ अर्थहीन होईल अशी खेद त्यांनी व्यक्त केली.
अमली पदार्थामुळे देशाला धोका आहे. यामुळे तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. हे असेच होत राहिल्यास पंजाबमध्ये विकास आणि वाढ अर्थहीन होईल.
दरम्यान, प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देखील मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, पंजाब पंजाबींनी चालवावा या विधानाचा त्यांनी चुकीचा अर्थ काढला.
पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपला मदत होईल असे वागू नका, असे म्हणत त्यांच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केला. त्यावर आता अमरिंदर सिंग यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले.माझा अपमान झाल्याचे जगाने पाहिल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसने आपल्याबद्दल घेतलेली भुमिका आणि त्यामुळे झालेला अपमान सर्वांनी पाहिला. तरीही रावत उलट माझ्याबद्दल असे भाष्य करत आहेत. जर हा माझा अपमान नव्हता तर काय होते? असा प्रश्न यावेळी अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.