मुंबई: उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) भाजप उमेदवाराच्या प्रचारा दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले याचे पडसाद मुंबईत उमटले असून, काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना असे वक्तव्य आसाम चे (Aasam) मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी केले होते या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबई युथ काँग्रेसने (Congress)आंदोलन छेडले असून मुंबई काँग्रेस कार्यालय इथे झीशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. (Congress Agitation In Mumbai
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले याचे पडसाद मुंबईत उमटले आहेत.
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले होते, राहुल गांधी तुम्ही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहात. आम्ही तुमच्याकडे तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा कधी मागितला आहे का? लष्कराने जर सांगितलं आहे की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला आहे तर तो त्यांनी केलाच आहे. त्याचे पुरावे कसले मागता? लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का, असा सवालही त्यांनी केला होता.
"जनरल बिपीन रावत आपल्या उत्तराखंड आणि देशाचे गौरव होते. त्यांच्या नेतृत्वात आपल्या भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. मात्र, राहुल गांधींनी काय विचारलं, पुरावे द्या. तुम्ही कुठल्या वडिलांचे पुत्र आहात, याचे पुरावे आम्ही कधी मागितले आहेत का?" असा प्रश्न सरमा यांनी विचारला. ही टीका करताना त्यांनी थेट माजी पंतप्रधान आणि राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांचा उल्लेख केला आहे. सोशल मीडियावरून अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.