Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ म्हैसुरात दाखल; राहुल गांधींकडून चामुंडेश्वरी देवीची विशेष पूजा

मणिपाल हॉस्पिटल सर्कलमार्गे पांडवपुरला रवाना होताना पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
congress Bharat Jodo yatra Mysore worship of Chamundeshwari Devi Rahul Gandhi
congress Bharat Jodo yatra Mysore worship of Chamundeshwari Devi Rahul Gandhisakal
Updated on

बंगळूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो पदयात्रा’ सोमवारी म्हैसूरमधील जय चामराज वडियार सर्कल येथून सुरू झाली. मणिपाल हॉस्पिटल सर्कलमार्गे पांडवपुरला रवाना होताना पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, राहुल गांधी यांनी चामुंडेश्वरी टेकडीवर जाऊन चामुंडेश्वरी देवीची विशेष पूजा केली. राहुल गांधी चामराजेंद्र सर्कलमधून म्हैसूर पॅलेसच्या नॉर्थ गेटसमोरून, अशोक रोड, फाऊंटन सर्कल, टिपू सुलतान सर्कल, मिलेनियम सर्कल, सेंट फिलोमेना कॉलेज, बन्नीमंतपा, जेएसएस मेडिकल कॉलेज, बंगळूर रोड, मणिपाल हॉस्पिटल सर्कल, रिंग रोड, केआर मिल, सिद्धलिंगपुर आणि नागनहळ्ळी गेटच्या काही भागातून भारत जोडो यात्रा गेली.

रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. नागनहळ्ळी गेट येथे विश्रांती घेतल्यानंतर पदयात्रा श्रीरंगपटणकडे निघाली. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी येथील चामुंडेश्‍वरी टेकडीवरील चामुंडेश्वरी मंदिराला भेट दिली आणि कर्नाटकमधील पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी विशेष पूजा केली. मंदिराला भेट दिल्यानंतर गांधींनी हिंदीत ट्विट केले की, ‘‘धार्मिक सौहार्द हा भारताच्या शांततापूर्ण आणि प्रगतिशील भविष्याचा पाया आहे.’’ राहुल गांधी यांनी आपल्या २६ व्या दिवसाच्या पदयात्रेला पहाटे सुरवात केली आणि १० दिवसांच्या दसरा उत्सवासाठी सजवलेल्या जुन्या शहरातील रस्त्यांवरून ते फिरले. राहुलच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. यात्रेने आतापर्यंत कर्नाटकात ६२ किमी आणि तमिळनाडू आणि केरळमध्ये ५३२ किमीचा प्रवास केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.