नवी दिल्ली : गेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा (Congress) दारुण पराभव झाला. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या निवडणुका कशा लढायच्या? त्यासाठी काय रणनिती असेल? इतकंच नाहीतर २०२४ च्या निवडणुकीत भाजपवर कशी मात करायची? यासाठी तीन दिवसीय चिंतन शिबिर (Congress Chintan Shivir) आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराला आजपासून राजस्थानमध्ये सुरुवात होत असून आज सोनिया गांधी (Sonia Gandhi) नेत्यांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळतेय.
काँग्रेसच्या शिबिरासाठी एकूण सहा गट तयार करण्यात आले आहेत. सर्व गटांमध्ये 60 ते 70 लोक आहेत. कोणत्याही प्रकारची कागदी चर्चा होणार नाही. कार्यक्रमादरम्यान, पक्षाचे नेते केंद्र-राज्य संबंध, ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थिती, जम्मू-काश्मीर समस्या आणि जातीय ध्रुवीकरण यावर चर्चा करतील. या सर्वांशिवाय इतर समित्या, सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक, वाढती महागाई, अल्पसंख्याकांचे प्रश्न आणि महिलांच्या समस्यांवर चर्चा करतील. नवीन शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी यावर युवक चर्चा करणार आहेत. तर कृषी समिती एमएसपी कायदेशीरकरण, कर्जमाफी आणि गव्हाच्या दराच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. याबाबत एएनआयने सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार होईल -
संघटना समिती राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर होत असलेल्या बदलांवर चर्चा करेल. मात्र, सर्वोपरी ते 'एक कुटुंब, एक तिकीट' या धोरणावर चर्चा करणार आहेत. चिंतन शिबिराचे सक्रिय सदस्य असलेल्या काँग्रेस नेत्याने सांगितले की, कार्यक्रम आयोजित करण्याचे मुख्य कारण म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करणे. .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.