नवी दिल्ली : केंद्र सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या एकीकृत पेन्शन योजनेवर (यूपीएस) काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. ‘‘यूपीएस मधील ‘यू’ म्हणजे मोदी सरकारचा ‘यू-टर्न’ आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी समाज माध्यमातून केली. एक जानेवारी २००४ पासून केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या सुमारे २३ लाख कर्मचाऱ्यांना यूपीएस योजनेचा लाभ मिळणार आहे.