Congress Meeting : काँग्रेस वर्किंग कमिटीची आज बैठक; संसदीय समितीच्या नेतेपदासाठी 'या' नेत्याचं नाव होणार फायनल?

काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहित म्हटलं की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक बोलावण्यात आलेली आहे. सकाळी ११ वाजता दिल्लीत हॉटेल अशोक येथे काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होईल. त्यानंतर दुपारी बारा वाजता एक पत्रकार परिषद होईल. सायंकाळी ५.३० वाजता संसदेच्या केंद्रीय कक्षात सर्व नवनिर्वाचित लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्यांच्या संसदीय समितीची बैठक होईल.
Congress Meeting : काँग्रेस वर्किंग कमिटीची आज बैठक; संसदीय समितीच्या नेतेपदासाठी 'या' नेत्याचं नाव होणार फायनल?
Updated on

India Alliance Meeting : काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची शनिवारी बैठक होत आहे. या बैठकीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दुपारी ११ वाजता ही बैठक संपन्न होणार असून सायंकाळी पाच वाजता संसदीय समितीची दुसरी बैठक बोलावण्यात आलेली आहे.

शुक्रवारी एनडीएच्या संसदीय समितीच बैठक संपन्न झाली. त्यात नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव नेतेपदासाठी राजनाथ सिंह यांनी ठेवला. एकमताने नरेंद्र मोदी यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आलं. शिवाय सायंकाळी मोदींनी राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये लोकसभेचे नवनिर्वाचित सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य उपस्थित राहतील. या बैठकीत लोकसभेत इंडिया आघाडीचा संसदीय दलाचा नेता निवडला जाणार आहे.

Congress Meeting : काँग्रेस वर्किंग कमिटीची आज बैठक; संसदीय समितीच्या नेतेपदासाठी 'या' नेत्याचं नाव होणार फायनल?
Praful Patel: प्रफुल्ल पटेलांना कोर्टाचा मोठा दिलासा! ईडीने जप्त केलेली मुंबईतील 180 कोटींची घरे परत मिळणार

काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहित म्हटलं की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक बोलावण्यात आलेली आहे. सकाळी ११ वाजता दिल्लीत हॉटेल अशोक येथे काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होईल. त्यानंतर दुपारी बारा वाजता एक पत्रकार परिषद होईल. सायंकाळी ५.३० वाजता संसदेच्या केंद्रीय कक्षात सर्व नवनिर्वाचित लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्यांच्या संसदीय समितीची बैठक होईल.

Congress Meeting : काँग्रेस वर्किंग कमिटीची आज बैठक; संसदीय समितीच्या नेतेपदासाठी 'या' नेत्याचं नाव होणार फायनल?
NZ vs AFG : टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोठी उलथापालथ! अफगाणिस्तानने न्यूझीलंड संघाला दिला मोठा धक्का; रशीदचा कहर

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातील एक काँग्रेसचा बंडखोर मिळून हा आकडा शंभर होतो. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या संसदीय समितीच्या नेतेपदी राहुल गांधींचं नाव आघाडीवर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com