Bihar Politics:बिहारमध्ये काँग्रेसला हवीत आणखी मंत्रिपदं; सत्तेचा तिढा तेजस्वी यादवांच्या कोर्टात

Congress in Bihar :मंत्रिमंडळ विस्तारच्या मुद्द्यावर वातावरण पुन्हा तापलय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॉंग्रेस पक्ष २ जागांची मागणी करत आहे.
Lalu Prasad Yadav and Tejaswi Yadav
Lalu Prasad Yadav and Tejaswi Yadav
Updated on

Congress in Bihar:बिहार मंत्रिमंडळ विस्तारच्या मुद्द्यावर वातावरण पुन्हा तापलय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॉंग्रेस पक्ष २ जागांची मागणी करत आहे. मागच्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरु होती. मात्र, युतीमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत सहमती न झाल्याने नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कॅबिनेट विस्ताराबद्दलही चर्चा केली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केला जाईल आणि कॉंग्रेस पक्षाला त्यात स्थान दिले जाईल. कॉंग्रेस पक्षाकडून दोन मंत्रिपदांची मागणी वारंवार केली जात आहे.

अखिलेश सिंह म्हणाले की याबद्दल उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा झाली आहे. यावर नितीश कुमार यांच्याचीही सल्लामसलत केली जाईल. त्यानंतर तारीख ठरवली जाईल की नव्या सदस्यांना मंत्रिमंडळात केव्हा सामील केलं जाईल.

बिहारमध्ये कॉंग्रेस बऱ्याच वेळेपासून आपल्या १९ आमदारांच्या जोरावर मंत्रिमंडळात ४ जागांची मागणी करत आहे. अखिलेश सिंह यांच्या वक्तव्यावरुन कॉंग्रेसची ही मागणी पूर्ण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात कॉंग्रेसचे दोन मंत्री आहेत. दलित प्रवर्गातून मुरारी प्रसद गौतम आणि अल्पसंख्याक वर्गातून अफाक आलम यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे.

मात्र, आणखी दोन मंत्रिपद मिळावित यासाठी प्रदेशाध्यक्ष अखिलेश सिंह जोर लावत आहेत. तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांनी यावर आधीच चर्चा केली आहे. २३ जुनला पटना येथे झालेल्या विरोधकांच्या एकता बैठकीत राहुल गांधी यांनी नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा केली होती.

Lalu Prasad Yadav and Tejaswi Yadav
Irfan Hasan Extortion:माफिया अतिक अहमदच्या टोळीतील गुंड इरफान हसन पोलिसांच्या तावडीत, ५० लाखांच्या खंडणी प्रकरणात अटक

मोदी आडनावाच्या बदनामी प्रकरणात सुप्रिम कोर्टातून निकाल आल्यावर अखिलेश सिंह यांनी भाजपवर हल्ला केला. ते म्हणाले की राहुल गांधी यांचा विजय हा सत्याचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधात कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केले जात होते, ज्यात त्यांना यश आले नाही. कोर्टाच्या निर्णयाने भाजपला उत्तर मिळाले आहे. २०२४च्या निवडणूकीत जनता त्यांना उत्तर देईल.

Lalu Prasad Yadav and Tejaswi Yadav
India Vs Pakistan : दबाव नाही तर... वर्ल्डकपमध्ये भारताकडून पाकिस्तान सारखं का हरतं? वकार युनूसने कोडं उलगडलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.