मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रस पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवत 163 जागा जिंकल्या आहेत. येथे 230 पैकी काँग्रेसला अवघ्या 66 जागा जिंकता आल्या. भारतीय जनता पक्षाच्या या मोठ्या विजयानंतर काँग्रेसचे बडे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्वजय सिंह यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
विधानसभा निवडणूकांचे निकाल समोर आल्यानंतर दोनच दिवसांनी दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर ईव्हीएम मशीन्सबद्दल पोस्ट केली आहे. चीप असलेली कोणतीही मशीन हॅक केली जाऊ शकते. मी EVM मशीन वापरून मतदान घेण्याचाविरोध करत आहे.
आपण भारतीय लोकशाहीला व्यावसायिक हॅकर्सच्या ताब्यात जाऊ देऊ शकतो का? हा मूलभूत प्रश्न आहे ज्याकडे सर्व राजकीय पक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे. ECI आणि सर्वोच्च न्यायालय तुम्ही कृपया आमच्या भारतीय लोकशाहीचे रक्षण कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. सिंह यांनी यासोबत एक ट्वीटर थ्रेड देखील शेअर केला आहे.
यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केलेल्या पोस्टमधअये पोस्टल बॅलेटमधून मिळालेल्या मतांची माहिती दिली होती. पोस्टल बॅलटच्या माध्यामातून पडलेल्या मतांमध्ये अनेक जागांवर काँग्रेस पक्षाला भाजपपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. यावर प्रश्न उपस्थित कर सिंह यांनी जर जनाता तिच आहे तर EVM आणि पोस्टल बॅलेटच्या व्होटींग पॅटर्नमध्ये इतका फरक कसा आला आहे.
पोस्टल बॅलेटच्या निकालांची माहिती देताना दिग्विजय सिंह यांनी लिहिले की, पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून आम्ही अर्थात काँग्रेस 199 जागांवर आघाडीवर आहे, तर यापैकी बहुतांश जागांवर आम्हाला ईव्हीएम मतमोजणीत मतदारांचा पूर्ण विश्वास मिळू शकला नाही. व्यवस्था जिंकली की जनता हरते, असेही म्हणता येईल, असेही त्यांनी म्हटलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.