Karnataka Government Update : तीन महिन्यात कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने खळबळ

राज्याच्या राजकारणात बरेच बदल होण्याची शक्यता असल्याचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले.
Basavaraj Bommai
Basavaraj Bommaiesakal
Updated on
Summary

महाराष्ट्रात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने ज्याप्रमाणे भाजपला पाठिंबा दिला, त्याप्रमाणे राज्यातील काँग्रेसचे काही आमदार सरकारमधून बाहेर पडून राज्यातील भाजपला पाठिंबा देतील.

बंगळूर : राज्याच्या राजकारणात बरेच बदल होण्याची शक्यता असल्याचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले. रुद्राप्पा लमाणी यांची उपसभाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करताना ते म्हणाले की, हावेरी जिल्ह्यातून दोन ज्येष्ठ आमदार आहेत.

तुम्ही मंत्री व्हाल अशी अपेक्षा होती. परंतु, ते शक्य झाले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. राज्यातील काँग्रेस सरकारचे तीन महिन्यात पतन होईल, असे भाकीत माजी मंत्री के. एस ईश्वराप्पा यांनी व्यक्त केले.

Basavaraj Bommai
NCP Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप; शहांची तिसरी पिढी शरद पवारांसोबत!

दावनगिरी येथे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने ज्याप्रमाणे भाजपला पाठिंबा दिला, त्याप्रमाणे राज्यातील काँग्रेसचे काही आमदार सरकारमधून बाहेर पडून राज्यातील भाजपला पाठिंबा देतील.

Basavaraj Bommai
Laxman Mane : 'RSS कडून फोडाफोडीचं राजकारण, त्या 9 आमदारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला'

लोकसभा, तालुका व जिल्हा पंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपच्या प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्यांची लवकरच निवड करण्यात येईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.