आमदार मेवानी यांना गुजरातमध्ये अटक

वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांना काल (ता. २०) रात्री उशीरा आसाम पोलिसांनी गुजरातमध्ये अटक
congress gujarat mla jignesh mewani arrested by assam police from gujarat
congress gujarat mla jignesh mewani arrested by assam police from gujaratsakal
Updated on

अहमदाबाद : वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांना काल (ता. २०) रात्री उशीरा आसाम पोलिसांनी गुजरातमध्ये अटक करत आज सकाळी आसामला नेले. मेवानी यांच्या अटकेनंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. जिग्नेश मेवानी यांना गुजरातमधील पालनपूर येथून बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांना नंतर अहमदाबादला आणून नंतर विमानाने आसामला नेण्यात आले. मेवानी यांना अटक करण्यामागील निश्‍चित कारण जाहीर करण्यात आले नसले तरी, त्यांच्या ट्विटमध्ये नथुराम गोडसेचा उल्लेख होता, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्याने दिली.

मेवानी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या या ट्विटविरोधात आसाममधील कोक्राझार येथील भाजपच्या एका नेत्याने तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी प्राथमिक गुन्हे अहवाल (एफआयआर) नोंदवत कारवाई केली. मेवानी यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, समाजामध्ये द्वेष निर्माण करणे, शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने वादग्रस्त वक्तव्य करणे या आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मेवानी यांनी १८ एप्रिलला केलेले दोन ट्विट आता काढून टाकण्यात आले आहेत. मेवानी यांच्या अटकेचे वृत्त समजताच काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर आणि इतर नेत्यांनी अहमदाबाद विमानतळावर धाव घेत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()