नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने आक्रमकपणे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना दिसून येतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी मान्य असलेला व्यक्ती काँग्रेसचा कार्यकर्ता असूच शकत नाही, अशी ठाम मांडणी राहुल गांधींनी यापूर्वीही केली आहे. हीच मांडणी पुढे रेटत आज राहुल गांधींनी पुन्हा एकदा RSS च्या विचारधारेवर कोरडे आसूड ओढले आहेत. आज ते दिल्लीमध्ये ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनी नव्या लोगोचं अनावरण करताना बोलत होते.
RSS च्या विचारधारेशी समन्वय नाही
काँग्रेस नेत राहुल गांधी यांनी म्हटलंय की, काँग्रेसची विचारधारा ही भाजप आणि RSS च्या विचारधारेहून भिन्न आहे. एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी बाकी विचारधारांसोबत काही ना काही समझौता करु शकतो; मात्र RSS आणि भाजपच्या विचारधारेसोबत मी कसल्याही प्रकारचा समझौता करु शकत नाही. आपल्यासाठी खरंच मोठा प्रश्न आहे की, महात्मा गांधींची काँग्रेस आणि गोडसे आणि सावरकरांच्या विचारधारेमध्ये काय फरक आहे.
भाजप धर्माची दलाली करते
भाजपवाले स्वत:ला हिंदू पक्ष म्हणवून घेतात आणि संपूर्ण देशामध्ये लक्ष्मी आणि दुर्गेवर आक्रमम करतात. हे लोक जिथे जातात तिथे काही ठिकाणी लक्ष्मीला मारतात तर काही ठिकाणी दुर्गेला मारतात. हे हिंदू धर्माचा वापर करतात, हे धर्माची दलाली करतात. मात्र, हे लोक हिंदू नाहीत.
गांधींना RSS च्या विचाधारेने का मारलं?
गेल्या 100-200 वर्षांमध्ये जर कुणा व्यक्तीने हिंदू धर्माला जाणून घेतलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव महात्मा गांधी आहे. ही गोष्ट आपण आणि RSS-भाजपचे लोक देखील मान्य करतात. मात्र, जर महात्मा गांधींनी हिंदू धर्माला समजून घेत आपलं संपूर्ण आयुष्य हिंदू धर्मासाठी वाहून दिलं तर RSS च्या विचारधारेने त्या हिंदूच्या छातीमध्ये तीन गोळ्या का झाडल्या? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.