उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांच्या (Uttar Pradesh Assembly Elections) रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये काँग्रेस (Congress) उमेदवार अर्चना गौतम (Archana Gautam) प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. त्यांच्या व्हायरल झालेल्या छायाचित्रांची चांगलीच चर्चा सुरू आहे. मॉडेलिंग क्षेत्र सोडून राजकारणात आलेल्या अर्चनाचे फोटो सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय आहे. अर्चनाचे बिकिनी घातलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर तिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपला व्यवसाय आणि राजकीय कारकीर्द यांची सांगड घालू नये, असं आवाहन त्यांनी माध्यमांना केले.
अर्चना गौतमने सांगितलं की, मी मिस बिकिनी 2018 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. मी मिस उत्तर प्रदेश 2014 आणि मिस कॉस्मो वर्ल्ड 2018 होते. मी लोकांना विनंती करते की, माझ्या राजकीय कारकिर्दीत माझ्या व्यवसायीक आयुष्याची सांगड घालू नका. मॉडेल अर्चना यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीपूर्वी हस्तिनापूरसाठी आपल्या व्हिजनबद्दल बोलताना गौतम म्हणाल्या की, जर त्या निवडणूक जिंकल्या तर त्याचं मुख्य लक्ष विकास कामांवर असेल.
अर्चना गौतम म्हणाल्या की, हस्तिनापूर हे 'प्राचीन आणि पवित्र' शहर आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याचा विकास होणं गरजेचं आहे. येथून निवडणूक जिंकल्यास पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करेन. हस्तिनापूर हे पर्यटन स्थळ असून येथे अनेक प्राचीन मंदिरं आहेत. कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे लोक येथे येऊ शकत नाहीत. आमदार झाल्यानंतर माझं पहिलं प्राधान्य बसस्थानक आणि रेल्वे स्थानक उभारणीला असेल. पर्यटनाला चालना मिळाल्यास इथे अधिक पर्यटक येतील आणि लोकांना रोजगार मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.