पाच राज्यांतील निवडणुका संपताच इंधनाचे दराने उच्चांकी पातळी गाठली आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दरात वाढ होत आहे यावरुन आज दिल्लीत काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात आंदोलन पुकारले. इंधनाचे दर मागे घ्यावेत, अशी काँग्रेस मागणी करत आहे. या आंदोलनात राहूल गांधीसह अनेक काँगेस नेते सहभागी झाले आहेत. (Congress leaders including Rahul Gandhi hold protest demonstration at Vijay Chowk against fuel price hike )
आंदोलनस्थळी बोलताना काँग्रेस नेते राहूल गांधी म्हणाले, " मागील दहा दिवसापासून नऊ वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहे. याचा मोठा फटका गरीब आणि सामान्य लोकांना पडतोय. इंधन दरवाढ थांबवावी, अशी आमची मागणी आहे. यासाठी आम्ही इथे आंदोलन करत आहोत. हे आंदोलन पुढे काही दिवस सुरु राहणार." सोबतच गरीबांपासून पैसा उकळावा आणि तो दोन -तीन अरबपतींच्या हाती सोपवावा, अशी विचारधारणा केंद्र सरकारची असल्याचेही राहूल गांधी म्हणाले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यांतील निवडणुका संपताच इंधनाचे दर वाढतील, असा अंदाज आम्ही व्यक्त केला होता. असे ते म्हणाले. "इंधनाचे दर मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे जनतेला होत असलेला त्रास केंद्र सरकार समजू शकत नाही."
दिल्लीच्या विजय चौकात ही निदर्शने केली असून काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. निवडणुक संपताच देशात इंधन दरवाढीत प्रचंड वाढ झाली आहे आणि याचा फटका सर्वसामान्यांना पडत आहे. याचा विरोध करण्यासाठी आज काँग्रेस रस्त्यावर उतरलाय.
उद्यापासून काँग्रेस इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारणार आहे. यात आज दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.