नवी दिल्ली - ‘मणिपूरमधील शांतता नष्ट करत तिथे अराजकता पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करीत असून, या राज्याला अनेक दशके मागे ढकलण्याचा कट आहे,’ असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवलेल्या पत्रात नड्डा यांनी हे आरोप केले आहेत.