चला, एकजूट होऊया! सोनिया गांधींनी बोलावली समविचारी विरोधकांची बैठक

Sonia Gandhi
Sonia Gandhi
Updated on

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरु झाली आहे. त्याप्रकारच्या राजकीय हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून दिसून येत आहेत. मध्यंतरी, शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसवगळता तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु झाली होती. मात्र, या चर्चा फोल ठरल्या. त्यानंतर विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व पश्चिम बंगालमध्ये भाजपला आसमान दाखवणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करतील, अशा देखील चर्चा सध्या रंगत आहेत. त्यामुळे, २०२४ च्या लोकसभेसाठी विरोधक कंबर कसून तयारी करत असल्याचं चित्र निर्माण झालंय. यातच आता आणखी एक घडामोड समोर येतीय. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २० ऑगस्ट रोजी समविचारी विरोधी पक्षांची एक बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हर्च्यूअल पद्धतीने होणार आहे. (Congress Interim President Sonia Gandhi virtual meeting of like minded Opposition parties on August 20)

Sonia Gandhi
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे भूमिका स्पष्ट करायला हवी - हायकोर्ट
Sonia Gandhi
रानडे इन्स्टिट्युटमधील संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या स्थलांतरणास स्थगिती

यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन इत्यादी नेते सामील होणार आहेत. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.