New Delhi News : काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही, असं मोठं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे. बंगळुरु इथं सुरु असलेल्या विरोधकांच्या बैठकीत त्यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळं देशाचं राजकारण आणखी वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे. (Congress is not interested in power or PM post says Kharge at opposition meeting)
एएनआयच्या वृत्तानुसार विरोधकांच्या बैठकीत बोलातना खर्गे म्हणाले, "मी स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नईत आयोजित कार्यक्रमात यापूर्वीच बोललो आहे की, काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी आणि पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही.
या बैठकीत आमची भावना ही स्वतःसाठी सत्ता मिळवणं अशी नाही. आमची भावना ही संविधानाचं संरक्षण करणं, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचं संरक्षण करणं ही आहे"
आमच्यापैकी काही लोकांमध्ये मतभिन्नता आहे. पण ही राज्यस्तरावर असून ती वैचारिकस्तरावर नाही. भाजपप्रणित एनडीए सरकारच्या धोरणांमुळं ज्यांना त्रास झाला आहे त्याच्यापुढं ही समस्या खूप मोठी नाही, खर्गेंनी या बैठकीत म्हटलं आहे.
तसेच यासाठी त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचं उदाहरण दिलं आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार हा प्रश्न नाही. उलट विभाजीत शक्तींविरोधात लोकांनी एकत्र येणं महत्वाचं आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
खर्गे चेन्नईत म्हणाले होते की, 'विभाजित शक्तींचा' संयुक्त आघाडीवर सामना करणे अत्यावश्यक आहे. कोण नेतृत्व करेल किंवा करणार नाही हे काँग्रेस सांगत नाही. तर पक्षानं धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.