हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. तर अपक्ष यामध्ये महत्वाचा मुद्दा ठरेल असे दिसून येत आहे. काँग्रेस भाजपमध्ये अपक्षांची बाजू मोलाची ठरणार आहे. हिमाचालमध्ये काँग्रेसने मजल मारली आहे. तर भाजप पिछाडीवर गेले आहे. आता काँग्रेस 37 जागांवर आहे तर भाजप 27 जागांवर आहे त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचत आहे. ही अटीतटीची लढत आणखी रंजक होण्याची शक्यता आहे. अशातच भाजप काँग्रेसचे आमदार फोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू झाली आहे.
हिमाचालमध्ये मतांची टक्केवारी आणि आकडे पाहता पक्षातील आमदारांमध्ये फुट पडण्याची शक्यता असल्यामुळे नेत्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. आमदारांच्या सुरक्षेसाठी पदाधिकारी कामाला लागल्याची माहिती समोर आली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हलचालींना वेग आला आहे.
तर हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, विनोद तावडेंची बैठक सुरू झाली आहे. हिमाचलमध्ये लढत एकदम रंगत होत आहे. अशातच काठावर आकडे असल्यामुळे इतर शक्यतांची पडताळणी सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींमध्ये अपक्ष उमेदवारही महत्वाचे ठरणार आहेत. अशातच हिमाचलमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताचं सरकार बनवेल आणि लोकसभेत चांगलं प्रदर्शनही करेल. त्याचबरोबर भय निर्माण करण्याचं काम भाजपकडून जाणीवपूर्वक झालं आहे असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.