Jairam Ramesh : 'सावरकरांनी नेहमीच भारत तोडण्याचा प्रयत्न केला, BJP-RSS तेच करत आहे'

राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळं पुन्हा राजकारण तापलंय.
Congress Jairam Ramesh
Congress Jairam Rameshesakal
Updated on
Summary

राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळं पुन्हा राजकारण तापलंय.

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचारवंत वीर सावरकर (Veer Savarkar), भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला. सावरकरांनी नेहमीच भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आणि भाजप-आरएसएस तेच करत आहे, असं त्यांनी म्हटलंय.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगाव इथं पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या जनआंदोलनाचं महत्त्व सांगताना जयराम रमेश म्हणाले, 'आर्थिक आव्हानं, समाजाचं ध्रुवीकरण आणि राजकारणातील हुकूमशाही यामुळं देश तुटत चालला आहे. त्यामुळंच आम्ही भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु केलीय.'

Congress Jairam Ramesh
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादात पवारांची एन्ट्री; जत मागणाऱ्या बोम्मईंना दिलं त्यांच्याच शब्दांत उत्तर

राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळं पुन्हा राजकारण तापलंय. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती आणि त्यांची माफी मागितली होती, असं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेच्या सभेत म्हटलं होतं. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते संजय राऊतही संतापले होते. हिंदू नेत्यावर काँग्रेसनं केलेल्या टीकेमुळं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो, असं राऊत म्हणाले होते.

Congress Jairam Ramesh
Shashikant Shinde : छत्रपतींचा अपमान करून इतिहास बदलणारी पिलावळ उखडून टाका; आमदार शिंदे संतापले

मागील पत्रकार परिषदेत जयराम यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल खोटं बोलल्याबद्दल भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले, 'ज्या दिवशी भाजप आणि आरएसएसचे लोक आमच्या नेत्यांबद्दल खोटं बोलणं बंद करतील, तेव्हा आम्ही भाजप नेत्यांबद्दल खरं बोलणं बंद करु. पंतप्रधान मोदींनी स्वतः भारत जोडो यात्रेच्या पावलावर पाऊल ठेवून दक्षिण भारतातील चार राज्यांचा दौरा केला. पण, त्यांनी फक्त काही ठिकाणी फोटो काढले आणि निघून गेले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.