कॉंग्रेसची राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान, मध्य प्रदेशमध्ये गुरुवारी (1 डिसेंबर 2022) ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रमेश यांनी सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यामागील कारणांबाबत गोप्यस्फोट केला आहे.
जयराम रमेश म्हणाले की, ज्योतिरादित्य सिंधिया यांना कॅबिनेट मंत्री व्हायचे होते आणि त्यांना सफदरजंगमधील 27 क्रमांकाच्या बंगल्यात राहायचे होते, म्हणून त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ही दोन कारणे होती, बाकी सर्व निमित्त होते. महत्वाचे म्हणजे सिंधिया यांनी काँग्रेस सोडल्यामुळेच आज मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेबाहेर आहे.
हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या हेतू आणि धोरणांमुळे भारताचे विघटन होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाहीमुळे भारताचे तुकडे होण्याची शक्यता वाढली आहे. ते रोखण्यासाठी भारत जोडो यात्रा काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे त्यांनी सांगितले की , आतापर्यंत ज्यांचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही, असेही लोक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. काँग्रेसच्या या प्रवासात सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतल्याचे ते म्हणाले. मध्य प्रदेशातील यात्रा दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप देखील जयराम रमेश यांनी यावेली केला. इंदूरमध्ये यात्रेचे बॅनर काढण्यात आले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांशी वादावादी झाली. त्यानंतरही ही यात्रा सफल झाली असेही ते म्हणाले.
जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रा 4 डिसेंबरला राजस्थानमध्ये दाखल होईल. 19 डिसेंबरला अलवरमध्ये मोठा मेळावा होणार आहे. तर 24 डिसेंबरला ही यात्रा दिल्लीत पोहोचेल. चार-पाच दिवसांची विश्रांती असेल. ट्रान्झिटमधील कंटेनरच्या देखरेखीचे काम केले जाईल. त्यानंतर भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबमार्गे श्रीनगरला पोहोचेल. 26 जानेवारीला राहुल गांधींच्या हस्ते श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.