"मोदींचा द्वेष करून स्वतःचा नाश करत आहात"; काँग्रेस नेत्यांचा विरोधकांना घरचा आहेर

आचार्य प्रमोद कृष्णम हे आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. एवढेच नाही तर ते I.N.D.I.A आघाडीतील पक्षांनाही लक्ष्य करत असतात.
Congress leader Acharya Pramod Krishnam
Congress leader Acharya Pramod Krishnamesakal
Updated on

Congress leader Acharya Pramod Krishnam: काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. त्यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना विरोध करावा पण त्यांचा द्वेष करू नये. राम हा भारताचा आत्मा असून रामाशिवाय भारताची कल्पना करता येणार नाही. पाकिस्तानी लोकही रामाचा द्वेष करत नाहीत, त्यामुळे भारतात श्री रामाला विरोध नसावा, प्रत्येक कोपऱ्यात राम आहे, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणतात, "... तुम्ही पीएम मोदींना विरोध करू शकता आणि त्यांच्या निर्णयांवर टीका करू शकता, परंतु पंतप्रधान मोदींचा तिरस्कार करणे हे लोकशाहीचे लक्षण नाही. काही लोक पीएम मोदींचा द्वेष करून स्वतःचा नाश करत आहेत... ही नकारात्मक ऊर्जा आहे. लोकशाहीत नकारात्मकतेला जागा नाही... स्वस्थ टीकेला जागा आहे... भगवान रामाला विरोध करणारे नास्तिक आहेत" (Latest Marathi News)

Congress leader Acharya Pramod Krishnam
IIT BHUच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी तिघांना अटक, राजकीय पक्षाशी कनेक्शन

रामजींचा 22 तारखेला अभिषेक होत आहे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. महात्मा गांधींनी ज्या रामराज्याची कल्पना केली होती ती आज साकार होत आहे. रामाचा द्वेष करणाऱ्यांना भारतीय राजकारणात स्थान नसावे. ज्यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे त्यांनी जरूर जावे, हे त्यांचे भाग्य आहे आणि जे जात नाहीत त्यांचे दुर्दैव आहे. रामजींच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा समस्त भारतीयांसाठी उत्सवाचा विषय आहे, प्रत्येकाने हा दिवस उत्सवासारखा साजरा केला पाहिजे, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. 

Congress leader Acharya Pramod Krishnam
Team India 2024 Full Schedule : 2024 मध्ये टीम इंडियाचा कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध रंगणार थरार? जाणून घ्या शेड्यूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.