'कोण हे कपिल सिबल? त्यांचं काय कर्तृत्व?' जी-२३ नेत्यांवर भडकले काँग्रेस नेते

'कोण हे कपिल सिबल? त्यांचं काय कर्तृत्व?' जी-२३ नेत्यांवर भडकले काँग्रेस नेते
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या राज्यांचे निकाल जाहीर झाले मात्र, या पाचही राज्यांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ला आहे. एकूण पाच राज्यांत मिळूनही काँग्रेसला शंभरी पार करता आलेली नाही. त्यानंतर सोनिया गांधींनी पंजाबचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू, उत्तर प्रदेशचे अजय लल्लू, उत्तराखंडचे गणेश गोदियाल, गोव्याचे गिरीष चोडणकर आणि मनिपुरच्या एन. लोकेन सिंह यांना राजीनामे मागितले आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेसमध्ये पक्ष नेतृत्वावर नाराज असणारा जी-२३ नेत्यांचा गट पुन्हा सक्रीय झाला असून त्यांनीही आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे.

'कोण हे कपिल सिबल? त्यांचं काय कर्तृत्व?' जी-२३ नेत्यांवर भडकले काँग्रेस नेते
हायकमांडचा आदेश! काँग्रेसमध्ये राजीनामासत्राला सुरुवात

काँग्रेसमधील या जी-२३ नेत्यांच्या काही मागण्या आहेत. पक्ष संघटनेमध्ये विधायक बदल व्हावेत, असं म्हणत त्यांनी काही मागण्या नेतृत्वाकडे लावून धरल्या आहेत. मात्र, हा गट प्रत्यक्ष मैदानात काम करत नसतो मात्र, आपल्याच पक्षावर टीका करण्याचं काम करतो, अशी टीका गांधी कुटुंबियांशी एकनिष्ठ असलेले काँग्रेसचे नेते करताना दिसतात. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवरच आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी जी-२३ गटातील सदस्य आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकीकडे काँग्रेस दिवसेंदिवस आपला जनाधार गमावत चालली आहे तर दुसरीकडे काँग्रेसमधील हे अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी जी-२३ नेत्यांवर टीका केली आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलंय की, कपिल सिब्बल कुठले नेते आहेत मला माहिती नाहीत. मात्र, त्यांना स्वत:ला काँग्रेस पक्षामुळे बरेच लाभ झाले आहेत. जेंव्हा यूपीएचं सरकार सत्तेवर होतं आणि ते जेंव्हा मंत्री होते तेंव्हा त्यांचं सगळं व्यवस्थित होतं मात्र, आता सत्ता गेल्यावर त्यांना वाईट वाटतंय. (Kapil Sibal)

'कोण हे कपिल सिबल? त्यांचं काय कर्तृत्व?' जी-२३ नेत्यांवर भडकले काँग्रेस नेते
घराणेशाहीचे पक्ष देशाला पोखरताहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढे जी-२३ गटावर टीका करताना अधीर रंजन चौधरींनी म्हटलंय की, या जी-२३ गटातील लोकांना काँग्रेस जेंव्हा सत्तेबाहेर असते तेंव्हा राहण्याची सवयच नाहीये. म्हणूनच ते अशा प्रकारच्या टीका करुन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला माहिती नाही की, कपिल सिब्बल यांचा मास बेस कोणता आहे?

कपिल सिब्बल यांनी एखादं उदाहरण घालून द्यावं की, ते सुद्धा काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय काहीतरी करु शकतात. त्यांनी स्वत:च्या विचारधारेसाठी स्वत:हून लढून दाखवावं. अन्यथा, एसी रुममध्ये निव्वळ बसून माध्यमांना मुलाखती देण्याचा काय फायदा आहे? (Congress leader Adhir Ranjan Chowdhury)

दुसरीकडे काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनीही त्यांच्यावर टीका करत म्हटलंय की, कपिल सिब्बल हे भलेही चांगले वकील असतील पण ते काँग्रेस पक्षाचे चांगले नेते नाहीत. काँग्रेसचे काम करण्यासाठी ते कधीही गावात गेले नाहीत. ते जाणीवपूर्वक पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधी किंवा काँग्रेस पक्षाला कोणीही कमकुवत करू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()