40 आमदार याआधीच दिल्लीत ठाण मांडून आहेत. अनेक आमदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना भेट मिळू शकलेली नाही
रायपूर- छत्तीसगडमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच मुख्यमंत्री भूपेश बघेल Chhattisgarh Chief Minister bhupesh baghel दिल्लीवारी करत आहेत. ते चार वाजता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशिवाय कृषीमंत्री रविंद्र चौबे आणि हवामान बदल मंत्री मोहम्मद अकबर यांनाही रायपूर विमानतळावर पाहिलं गेलं आहे. विशेष म्हणजे 40 आमदार याआधीच दिल्लीत ठाण मांडून आहेत. अनेक आमदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीचा प्रयत्न केला आहे, पण त्यांना भेट मिळू शकलेली नाही. (National Latest News)
राज्याचे आरोग्यमंत्री टीएम सिंह देव यांनी स्वत:ला मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. 2018 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी भूपेश बघेल आणि टीएस सिंह देव यांची नावे चर्चेत होती. असा अंदाज होता की सुरुवातीचे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद भूपेश बघेल यांच्याकडे असेल आणि पुढील अडीच वर्ष टीएस सिंह देव यांच्याकडे असेल. असे असले तरी याबाबत अधिकृत कोणतेही वक्तव्य करण्यात आले नव्हते.
भूपेश बघेल हे विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'मला वरिष्ठ नेत्यांनी बोलावलं आहे. केसी वेणुगोपाल यांनी मला संदेश पाठवला होता की, मी राहुल गांधींना भेटावे. त्यांच्या सूचनेनुसार मी दिल्लीत जात आहे. याव्यतरिक्त माझ्याकडे कसलीही माहिती नाही.' इतर काही नेते आणि मंत्र्यांनाही दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. याविषयी विचारले असता भूपेश म्हणाले की, 'ते वरिष्ठ नेत्यांना भेटायला जाऊ शकतात. मला कॉल आला म्हणून मी जात आहे. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांत वरिष्ठ नेत्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे सर्वजण दिल्लीत जात आहेत.' 40 आमदार दिल्लीत उपस्थित असल्याने नेतृत्व बदलाच्या चर्चा होत आहेत.
दरम्यान, टीएस सिंह देव म्हणाले होते की, जर एक प्लेअर टीमकडून खेळत असेल तर तो मुख्यमंत्री होण्याबाबत का विचार करु शकत नाही. डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ९० पैकी ६८ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेस राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अंतर्गत संघर्षामुळे त्रस्त होती. तेव्हा भूपेश बघेल यांच्यासह ताम्रध्वज साहू, चंद्रहास महंत आणि टीअम सिंह देव यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.