मोदींना कॉंग्रेस नेत्यांकडून किमान ८० वेळा शिव्याशाप!

भाजपने जंत्री जाहीर केली
congress leader criticize narendra modi shek husen subodhkant sahay used 80 dirty words on record rahul gandhi ed inquiry new delhi
congress leader criticize narendra modi shek husen subodhkant sahay used 80 dirty words on record rahul gandhi ed inquiry new delhiSakal
Updated on

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना नागपूरचे शेख हुसेन यांच्यापाठोपाठ कॉंग्रेसचे दुसरे नेते सुबोधकांत सहाय यांची जीभ आज पुन्हा घसरली. त्याबरोबर भाजपने कॉंग्रेस नेत्यांनी अलीकडच्या काळात मोदींना उद्देशून ‘आॅन रेकॉर्ड वापरलेल्या तब्बल ८० गलिच्छ शब्दांची- शिव्यांची जंत्रीच अधिकृतरीत्या जाहीर केली. भाजपने त्या त्या नेत्यांचे उद्गार जसेच्या तसे, तारीखवार दिले आहेत. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी ‘ईडी‘ने मागील आठवड्यात सुरू केली. त्यानंतर कॉंग्रेसने देशभर सत्याग्रह आंदोलनास सुरवात केली.

यावेळी पंतप्रधानांवर टीका करताना या पक्षाच्या अनेक नेत्यांची जीभ बेलगाम झाल्याचे पुन्हा पहायला मिळत आहे. सहाय यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून आलेल्या या अपशब्दांच्या यादीत केवळ आजी माजी कॉंग्रेस नेत्यांनी केलेली टीका व अपशब्द आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे भगवंत मान, तमिळनाडूचे एम के स्टॅलीन, वृंदा करात, तपन सेन, हनन मौला, पी विजयन आदी माकप नेते, एमआयएम नेते असदुद्दिन ओवैसी, सपा नेते अखिलेश यादव, बसपा नेत्या मायावती यांच्यासारख्या अनेक विरोधी पक्षनेत्यांनी व शेतकरी आंदोलनातील नेत्यांनी मोदींबाबत वापरलेल्या अपशब्दांची यादी केली तर ही यादी शेकडोंच्या नव्हे हजारोंच्या, लाखोंच्या घरात जाईल असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

स्वतः पंतप्रधान आपल्यावर होणाऱया टीकेबाबत प्रचंड सहनशील असल्याचे भाजप नेते सांगतात.‘आपल्याला रोज १-२ किलो शिव्या खाल्याशिवाय जेवण पचतच नाही,‘‘ असे स्वतः मोदींनीच एकदा लोकसभेत विनोदाने सांगितले होते. ‘‘माझ्यावर व्यक्तिशः होणाऱया टीकेला तुम्ही उत्तरे देण्याच्या भानगडीत पडूच नका. ते पहायला व सहन करायला मी खंबीर आहे, असेही मोदींनी भाजप खासदारांना सांगितले होते. राज्यसभेत एकदा पंतप्रधानांनी विचारले होते की एका राज्याच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्याला (गुजरात) ‘आत टाकण्याच्या‘ ‘ तुला जेलमध्ये सडवू‘ अशा धमक्या दिल्लीतून अक्षरशः रोजच्या रोज दिल्या जात असत, हीच तुमची (कॉंग्रेस) लोकशाहीची व्याख्या आहे काय ?

दरम्यान भाजपचया ताज्या यादीनुसार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींपासून, राहूल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, हुसेन दलवाई, कमलनाथ, दिग्विजयसिह, मणीशंकर अय्यर, राशीद अल्वी,अधीर रंजन चौधरी, पवन खेडा, रणदीप सुरजेवाला, जिग्नेश मेवाणी, आदी तमाम छोट्या- मोठ्या कॉंग्रेस नेत्यांनी मोदींवर कोणत्या भाषेत टीका केली याची जंत्रीच दिली आहे. बी के हरिप्रसाद यांनी २००९ मध्ये मोदींना गंदी नाली का कीडा म्हटले तेव्हापासून सहाय यांच्या आजच्या टीकेपर्यंत विविध कांग्रेस नेत्यांची नेत्यांची अवतरणेच भाजपने दिली आहेत.

काँग्रेस नेत्यांनी मोदींना उद्देशून, गंदी नाली का कीडा, मौत का सौदागर, विषाची शेती करणारे, गंगू तेली, भस्मासूर, तुघलक, गझनी, औरंगजेबाचा अवतार, हिंदू अतिरेकी, नपुंसक. मूल जन्माला घालू न शकल्याने पत्नीला सोडणारे, अतिरेकी गोडसेचे अपत्य, चौकीदार चोर, खिसेकापू, घोडा, गाढव, वानर, साप, विंचू, उंदीर, बकरा, डुक्कर अशा प्रकारे किती व कसे कसे अपशब्द वापरले याचीही जंत्री भाजपने दिली आहे. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी, ‘‘मोदींचा बाप कोण याबद्दल जगात कोणालाच माहिती नाही,‘ अशी भाषा वापरल्याचेही यात दिसते. भाजपच्या या यादीत सध्या भाजपवासी झालेले हार्दिक पटेल व तरूंगात असलेले नवज्योतसिंग सिध्दू यांनी यापूर्वी काढलेले उद्गारही त्यांच्या नावानिशी सामील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.