नवी दिल्ली : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘‘मणिपूर ना एक आहे, ना सेफ आहे, असे म्हणत राज्यातील जनता तुम्हाला क्षमा करणार नाही,’’ अशा शब्दांत खर्गे यांनी समाज माध्यमातून केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.