नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आज सोमवारी सरकारवर कोरोना संकटाशी निगडीत आकडेवारी दाबली जात असल्याचा आरोप केला आहे. प्रियांका गांधींनी म्हटलंय की, मोदी सरकार हे लोकांचं आयुष्य वाचवण्यापेक्षा अधिक प्रोपगंडा पसरवण्यामध्येच व्यस्त आहे आणि यामुळेच देशाच्या प्रतिमेला 'मोठा तडा' गेला आहे. 'जिम्मेदार कौन' अर्थात 'जबाबदार कोण' या आपल्या मोहिमेद्वारे सरकारला सवाल विचारत प्रियांका गांधी यांनी ही टीका केली आहे. तसेच गांधी यांनी कोरोना संकटाशी सरकार ज्या धोरणांनी लढत आहे, त्यावर देखील त्यांनी प्रश्न उभे केले आहेत.
आपल्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर प्रियांका गांधींनी विचारलंय की, लोकांचं आयुष्य वाचवण्यापेक्षाही पंतप्रधानांची प्रतिमा जपणं अधिक महत्त्वाचं आहे का? पुढे त्यांनी म्हटलंय की, सरकार कोरोनाशी निगडीत आकड्यांना एक 'प्रोपगंडा टूल'च्या स्वरुपात वापरत आहे. कोरोना संकटाच्या सुरुवातीपासूनच मोदी सरकारची निती ही कोरोनाच्या डेटाचा उपयोग आपल्या प्रोपगंडाच्या विस्तारासाठी केला आहे. सरकारची यंत्रणा डेटा लपवणे आणि दाबण्यामध्ये व्यस्त आहे. ही यंत्रणा सरकारच्या राजकीय अजेंड्याला पूर्ण करण्यासाठी काम करत आहे तर दुसरीकडे अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत.
सुरुवातीपासूनच लोकांची अशी दिशाभूल करण्यात आली की संक्रमण आणि मृत्यूच्या आकड्यांनी घाबरण्याची गरज नाहीये. असं सांगितलं जात होतं की, योग्य संख्येने कोरोना चाचण्या सुरु आहेत मात्र सत्य याच्याहून बरोबर उलटं होतं. पुढे त्यांनी म्हटलंय की, आता तर असं दिसतंय की, लसीकरण अभियानावर देखील सरकार आपल्या त्याच पद्धतीचा वापर करत आहे.
प्रियांका गांधींनी म्हटलं की, लोकांचं आयुष्य वाचवण्याऐवजी प्रोपगंडावर अधिक भर दिल्याने मोठं नुकसान झालं आहे. सरकारने लोकांना उत्तरदायी असायला हवं. युपी सरकारवर निशाणा साधताना त्यांनी म्हटलं की, सत्य लपवण्यासाठी राज्य सरकारने आरटीपीसीआर आणि एँटीजन टेस्टचे आकडे एकत्रित करुन दाखवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.