Priyanka Gandhi: जेपी नड्डांच्या पत्राला प्रियंका गांधींचं उत्तर; म्हणाल्या, चुकीच्या भाषेचा वापर...

JP Nadda News: पंतप्रधानांची निष्ठा जर लोकशाही मूल्यांमध्ये, बरोबरीच्या संवाद व ज्येष्ठ नेत्यांना सन्मान देण्यामध्ये असती तर त्यांनी स्वतः या पत्राचे उत्तर दिले असते. परंतु त्यांनी तसे न करता या पत्राचे उत्तर जे. पी. नड्डा यांच्याकडून आक्रमक व हीन भाषेचा वापर करून उत्तर पाठवून दिले.
Congress candidate Adv. Congress leader Priyanka Gandhi speaking at a public meeting held on the occasion of Gowal Padavi's campaign
Congress leader Priyanka Gandhi esakal
Updated on

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राचे उत्तर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिलेले उत्तर हे एक निम्नस्तराचे व ज्येष्ठ नेत्याचा अपमान करणारे असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांना जिवे मारण्याच्या धमक्या भाजप व सहयोगी पक्षाच्या नेत्यांकडून दिल्या गेल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी गेल्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले होते. या पत्राचे उत्तर पंतप्रधान मोदींनी न देता भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिले. या पत्रात जुन्या काळात झालेल्या आरोपप्रत्यारोपांना उजाळा दिला आहे. राहुल गांधी यांना मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे पत्र लिहिले होते.

पंतप्रधानांची निष्ठा जर लोकशाही मूल्यांमध्ये, बरोबरीच्या संवाद व ज्येष्ठ नेत्यांना सन्मान देण्यामध्ये असती तर त्यांनी स्वतः या पत्राचे उत्तर दिले असते. परंतु त्यांनी तसे न करता या पत्राचे उत्तर जे. पी. नड्डा यांच्याकडून आक्रमक व हीन भाषेचा वापर करून उत्तर पाठवून दिले.

Congress candidate Adv. Congress leader Priyanka Gandhi speaking at a public meeting held on the occasion of Gowal Padavi's campaign
Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

जवळपास 82 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचा असा अपमान करण्याची काय आवश्यकता होती, असा सवाल करून त्यांनी एक्स या समाज माध्यमावर म्हटले आहे की, लोकशाहीत प्रश्न विचारणे व संवाद साधण्याची परंपरा असते. आजच्या राजकारणात विष पसरले आहे. पंतप्रधानांनी पदाची प्रतिष्ठा राखत एक आदर्श घालून द्यायला पाहिजे. परंतु उच्च पदावर बसलेल्या नेत्यांनी या परंपरेपासून स्वतःला दूर ठेवले आहे, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.