Priyanka Gandhi : गाझातील युद्ध हा इस्राईल सरकारचा ‘असंस्कृतपणा’;काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वद्रांची नेतान्याहू यांच्यावर टीका

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आज गाझामधील ‘नरसंहारा’बद्दल इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर जोरदार टीका केली. हे युद्ध म्हणजे इस्राईल सरकारचा ‘असंस्कृतपणा’ असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Priyanka Gandhi
Priyanka Gandhisakal
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आज गाझामधील ‘नरसंहारा’बद्दल इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर जोरदार टीका केली. हे युद्ध म्हणजे इस्राईल सरकारचा ‘असंस्कृतपणा’ असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या नेतान्याहू यांनी बुधवारी अमेरिकेच्या संसदेत दिलेल्या भाषणात गाझामधील हल्ल्यांचे समर्थन केले होते. त्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ‘एक्स’वर ही प्रतिक्रिया दिली. प्रियांका म्हणाल्या,‘‘नागरिक, माता, वडील, डॉक्टर, परिचारिका, मदत कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, लेखक, कवी, ज्येष्ठ नागरिक आणि दिवसागणिक मृत्युमुखी पडणाऱ्या हजारो निष्पाप मुलांबाबत कितीही बोलले तरी पुरेसे नाही.

इस्राईल सरकारच्या वंशद्वेषी कृत्यांचा निषेध करणे आणि त्यांना युद्ध थांबवण्यास भाग पाडणे ही द्वेष आणि हिंसाचारावर विश्वास न ठेवणाऱ्या सर्व इस्रायली नागरिकांसह सारासार विचार करणाऱ्या सर्व नागरिकांची आणि देशांची नैतिक जबाबदारी आहे. सभ्यता आणि नैतिकतेच्या या जगात त्यांची कृती अस्वीकारार्ह आहे.

तरीही इस्राईलच्या पंतप्रधानांचे अमेरिकी काँग्रेसमध्ये उभे राहून स्वागत केले जाते. ते (नेतान्याहू) या युद्धाला ‘रानटीपणा आणि सभ्यता यांच्यातील संघर्ष'' असे म्हणतात. त्यांचे पूर्णपणे बरोबर आहेत; फरक इतकाच की हा रानटीपणा त्यांचे सरकार करत आहे आणि त्यांच्या या रानटीपणाला पाश्चात्य देशांकडून अखंड पाठिंबा दिला जात आहे. हे खरोखरच लाजिरवाणे आहे,’’ अशी टीका प्रियांका यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.