इंफाळ: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बहुचर्चित ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला आजपासून (ता. १४) मणिपूरमधून प्रारंभ होतो आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच राहुल हे थेट पुन्हा जनतेच्या दारात जात असल्याने काँग्रेसने यासाठी कंबर कसल्याचे दिसून येते. या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आणि सामाजिक न्याय हे मुद्दे लावून धरण्यात येतील. राहुल यांच्या दुसऱ्या टप्प्यातील न्याय यात्रेचा पंधरा राज्यांतून प्रवास होईल. शंभर लोकसभा मतदारसंघांमध्ये ते थेट लोकांशी संवाद साधतील.
केंद्र सरकार आम्हाला संसदेमध्ये बोलू देत नाही त्यामुळे आम्ही थेट लोकांमध्ये जाऊन बाजू मांडत आहोत, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले. सामाजिक न्याय, उदारमतवाद, समता आणि बंधुत्व या राज्यघटनेत उल्लेख केलेल्या मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी ही यात्रा सुरू करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते थौबलमध्ये उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधी आज रविवारी १२ वाजता वाजता इम्फाळला पोहोचतील आणि प्रथम खोंगजोम युद्ध स्मारकाला नमन करतील. त्यानंतर यात्रेला सुरुवात करतील. यात्रेच्या मार्गात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फक्त सुरुवातीचं ठिकाण बदलण्यात आला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 6713 किमी बसने आणि पायी प्रवास करेल. ही यात्रा 66 दिवस चालणार असून, 110 जिल्हे, 100 लोकसभा जागा आणि 337 विधानसभा मतदारसंघातून जाणार असून 20 किंवा 21 मार्च रोजी मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे.
कोणत्या राज्यातून किती किमी प्रवास?
मणिपूरमध्ये एका दिवसात चार जिल्ह्यांमधून 107 किलोमीटरचा प्रवास
नागालँडमधीळ 5 जिल्ह्यांमध्ये 257 किलोमीटरचा दोन दिवसांत प्रवास
आसामच्या 17 जिल्ह्यांमध्ये 833 किलोमीटरचा प्रवास 8 दिवसांत
अरुणाचल प्रदेशमध्ये 55 किमीचा प्रवास एका दिवसात
मेघालयमध्ये 5 किमीचा प्रवास एका दिवसात
पश्चिम बंगालमध्ये सात जिल्ह्यांमधून 523 किमीचा प्रवास 5 दिवसात
बिहारमध्ये 7 जिल्ह्यांतून 425 किमीचा प्रवास 4 दिवसांत
झारखंडमध्ये 8 दिवसांत 13 जिल्ह्यांमध्ये 804 किलोमीटरचा प्रवास
ओडिशात 341 किलोमीटरची यात्रा चार दिवसांत चार जिल्ह्यांमध्ये
छत्तीसगडमध्ये सात जिल्ह्यांतून 536 किलोमीटरचा पाच दिवसांचा प्रवास
उत्तर प्रदेशात 11 दिवसांत 20 जिल्ह्यांत 1074 किलोमीटरची यात्रा
मध्य प्रदेशात सात दिवसांत 9 जिल्ह्यांतून 698 किलोमीटरचा प्रवास
राजस्थानमध्ये 2 जिल्ह्यात 1 दिवसात 128 किमीची यात्रा
गुजरातमध्ये पाच दिवसात 7 जिल्ह्यांमध्ये 445 किलोमीटरचा प्रवास
महाराष्ट्रात पाच दिवसात 6 जिल्ह्यातून 479 किलोमीटरचा प्रवास
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.