Congress : 'राहुल गांधींनी माफी मागावी लागेल असं काही बोललंच नाही'; सॅम पित्रोदांचा भाजपवर पलटवार

भारतासारख्या लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal
Updated on
Summary

यापूर्वी सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधींबाबत अनेक ट्विट केले आहेत.

Sam Pitroda On Rahul Gandhi : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं सांगत बाहेरच्या देशांकडं मदत मागतात. त्यामुळं आपल्या देशाची बदनामी होते, अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांची प्रतिक्रिया समोर आलीये. पित्रोदा म्हणाले, 'राहुल गांधींनी माफी मागावी लागेल असं काहीही बोललं नाही. भारतासारख्या लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे.'

Rahul Gandhi
Earthquake : भूकंपानं न्यूझीलंडची धरती हादरली; त्सुनामीचा इशारा

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पित्रोदा म्हणाले, 'भाजप आता राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे. राहुल गांधींनी असं काहीही बोललं नाही की ज्यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे माफी मागावी लागेल. लोकशाहीत जर एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दल तीव्रतेनं वाटत असेल तर त्याला तसं बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. राहुल गांधींनी जे बोललं ते खरं आहे.'

Rahul Gandhi
US Ambassador : एरिक गार्सेट्टी भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत; दोन वर्षानंतर यूएस सिनेटची मंजुरी

यापूर्वी सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधींबाबत अनेक ट्विट केले आहेत. राहुल गांधी लंडनमध्ये जे बोलले त्याबद्दलचा खोटेपणाचा प्रचार आणि प्रसार करणं थांबवा. तुम्ही तिथं होता का? तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे का? राहुल गांधी काय म्हणाले तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल त्यांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.