नलिन कुमार यांच्या विधानाचा समाचार घेत काँग्रेसनं म्हटलंय, भाजप नेत्याला गंभीर मानसिक आजार झाला आहे.
कर्नाटकात विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election) तोंडावर आल्या असून पक्षश्रेष्ठींच्या भाषणबाजीला वेग आला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा खासदार नलिन कुमार (Nalin Kumar) यांनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद निर्माण केलाय. एका कार्यक्रमात ते म्हणाले, 'राहुल गांधी (Rahul Gandhi) लग्न करत नाहीत. कारण, त्यांना मुलं निर्माण करता येत नाहीत.' त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नलिन यांनी हे पहिल्यांदाच सांगितलं आहे असं नाही. यापूर्वीही त्यांनी अशी वादरग्रस्त विधानं केली आहेत. नुकतंच त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलं, रस्ते आणि गटार यासारखे छोटे मुद्दे सोडून तुम्ही लव्ह जिहादवर लक्ष केंद्रित केलं पाहिजं, असं म्हणाले होते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये भाजप खासदार नलिन कुमार कटील बोलताहेत. "सिद्धरामय्या (कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते) आणि राहुल गांधी यांनी सांगितलं होतं की, तुम्ही कोविड-19 लस घेऊ नका. कारण, तुम्हाला मुलं होणार नाहीत आणि नंतर त्यांनीच कोविड लस घेतली. एक दिवसांपूर्वी आमचे आमदार मंजुनाथ म्हणाले, की राहुल गांधी लग्न करत नाहीत याचं कारण त्यांना मुलं होऊ शकत नाहीत." भाजप खासदाराचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
नलिन कुमार यांच्या विधानाचा समाचार घेत काँग्रेसनं म्हटलंय, भाजप नेत्याला गंभीर मानसिक आजार झाला आहे. काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे म्हणाले, 'नलिन कुमार यांच्या बुद्धिमत्तेची कीव येत आहे. त्यांना गंभीर मानसिक आजार जडला आहे.'
यावर भाजपतर्फे कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री के सुधाकर म्हणाले, "आमच्या प्रदेशाध्यक्षांनी ही टिप्पणी कोणत्या संदर्भात केली हे मला माहित नाही, परंतु आम्हाला या वक्तव्यापासून दूरच राहायचं आहे. आम्ही या वक्तव्याचं समर्थन करुन इच्छित नाही."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.