नंदुरबार- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात आली आहे. राहुल गांधी आज सुमारे दोन वाजता नंदुरबारमध्ये आले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस नेते उपस्थित होते. नंदुरबारमध्ये घेतलेल्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (congress leader Rahul gandhi nyay yatra enter Maharashtra Nandurbar rally )
ते म्हणाले की, देशाचे खरे मालक हे आदिवासी आहेत. देशात जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा आदिवासी देशात होते. जंगल, जल, जमीन याचे खरे तुम्ही मालक आहात. वनवासीचा अर्थ जे लोक जंगलात राहतात. वनवासी आणि आदिवासीमध्ये फरक आहे. वनवासीमध्ये कोणताही अधिकार नाही, त्यामुळे भाजप तुम्हाला वनवासी म्हणते. पण, आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो.
जंगल संपले तर देशात आदिवासींचे काहीच राहणार नाही. सर्व जंगल अदानींसारख्याला दिले जाईल. पंतप्रधान मोदी यांनी देशातील २० ते २५ अरबपतींचे कर्ज माफ केले आहे. १६ लाख कोटी रुपये कर्ज माफ करण्यात आले आहे. मोदींनी आदिवासींचे कर्ज माफ केले आहे का? कुणाचं शिक्षणाचं कर्ज माफ केलं आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थितांना केला.
२४ वर्षांच्या मनरेगाचा पैसा जेवढा होईल तितकी कर्जमाफी अब्जाधीशांची करण्यात आली आहे. २२ लोक असे आहेत त्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. ७० कोटी लोकांकडे जितकी संपत्ती आहे तितकी संपत्ती या २२ लोकांकडे आहे. विमानतळ, बंदरे, मोठ्या कंपन्या, संरक्षण कंपन्या सर्व काही या २२ लोकांच्या हातात आहे. सर्व काही या लोकांसाठी केलं जात आहे, असं राहुल म्हणाले.
देशात आदिवासींची संख्या ८ टक्के आहे. हिस्सेदारीचा हा प्रश्न आहे. माध्यम कंपन्या कुणाच्या आहेत तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कधी आदिवासी पत्रकार पाहिला आहे का? माध्यमांमध्ये तुमचे काहीही प्रतिनिधित्व नाही. तुमचा मुद्दा माध्यमात दिसणार नाही. एका भाजप नेत्याने आदिवासी मुलाच्या तोंडावर लघवी केली. सोशल मीडियावर हे पाहायला मिळालं, असं राहुल म्हणाले.
देशातील मोठ्या २०० कंपन्यांच्या मालकांची यादी काढा, व्यवस्थापन करणाऱ्या लोकांची यादी काढा? यात एकही आदिवासी व्यक्ती नाही. तुम्ही माध्यमात नाही, भारताच्या मोठ्या कंपनीमध्ये नाही. देशाचे प्रशासन चालवतात त्या अधिकाऱ्यांमध्ये किती आदिवासी आहेत? ९० पैकी फक्त एक आदिवासी अधिकारी आहे. त्याला देखील बाजूला बसवण्यात आलं आहे, असं म्हणत राहुल यांनी टीका केली. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.