'आजपासून RSSला संघ परिवार म्हणणार नाही'; राहुल गांधींनी सांगितलं कारण

Rahul_Gandhi
Rahul_Gandhi
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला आहे. आता मी आरएसएसला संघ परिवार म्हणणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबतचं कारणही त्यांनी दिलं आहे. यासंदर्भात राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.
 
राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आरएसएस आणि संबंधित संघटनेला संघ परिवार म्हणणं योग्य नाही, असं मला वाटतं. परिवारात महिला असतात. ज्येष्ठांबद्दल आदर असतो, करुणा आणि आपुलकीची भावना असते, जी आरएसएसमध्ये नाही. त्यामुळे मी आता आरएसएसला संघ परिवार म्हणणार नाही. 

यापूर्वी झाशीमध्ये नन्ससोबत झालेल्या गैरवर्तनाचा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला होता. हा संघाच्या दुष्प्रचाराचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले होते. संघ एका समुदायाला दुसऱ्यांविरोधात उभे करत आहे. तसेच अल्पसंख्याकांना पायदळी तुडवण्याच्या विचाराचा हा परिणाम आहे, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचे विशेष अधिकार देण्यामुळे बिहारच्या विधानसभेत गोंधळ उडाला होता. याकडेही राहुल यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, नितीशकुमार हे आता आरएसएस-भाजपमय झाले आहेत. बिहार विधानसभेत झालेल्या लज्जास्पद घटनेमुळे मुख्यमंत्री नितीशकुमार हे पूर्णपणे आरएसएस आणि भाजपमय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

लोकशाहीचा अवमान करणार्‍यांना सरकार म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार नाही. विरोधी पक्ष जनतेच्या हिताच्यादृष्टीने वारंवार आवाज उठवत राहणार आहे, असेही कॉंग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.