Atiq Ahmed Grave : अतिकच्या कबरीवर तिरंगा ठेवत केली भारतरत्न देण्याची मागणी; काँग्रेस नेत्याचा Video Viral

Congress leader Rajkumar Raju puts Indian flag on Atiq Ahmed grave expelled video goes viral
Congress leader Rajkumar Raju puts Indian flag on Atiq Ahmed grave expelled video goes viral
Updated on

माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांच्या कबरीवर तिरंगा ठेवत अतिक अहमदला भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी एका काँग्रेस नेत्याने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी निलंबीत काँग्रेसचे नेते राजकुमार सिंग रज्जू यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यानंतर पोलीसांनी कारवाई केली.

माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांच्या कबरीवर तिरंगा ठेवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Congress leader Rajkumar Raju puts Indian flag on Atiq Ahmed grave expelled video goes viral
Same-Sex Marriage : 'सेम सेक्स मॅरेज' प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारचा दावा खोडला! केली महत्वाची टिप्पणी

काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार राजकुमार सिंग उर्फ ​​रज्जू यांनी माफिया अतिक आणि अशरफ यांच्या कबरीवर तिरंगा ठेवत त्यांना सलामी दिली. यासोबतच अतिक अहमदला शहीद असे संबोधित करत त्याला भारतरत्न द्या, अशी मागणी केली. इतकेच नाही तर अतिक शहीद झाल्याचं देखील म्हटलं. त्यांचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुसरीकडे या प्रकरणाची दखल घेत पक्षाने राजकुमार सिंह यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Congress leader Rajkumar Raju puts Indian flag on Atiq Ahmed grave expelled video goes viral
Aaradhya Bachchan : यूट्यूब टॅब्लॉइडविरोधात आराध्या बच्चन पोहोचली दिल्ली हायकोर्टात, जाणून घ्या काय आहे प्रकरण

काँग्रेस पक्षाने केली कारवाई

राजकुमार यांनी आपल्या वक्तव्यात या संपूर्ण प्रकरणाबाबत यूपी सरकारवर आरोप केले आहेत. तसेच सपाचे दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण मिळू शकतो, तर अतिक अहमद याला का सन्मानित केले जाऊ शकत नाही, असेही म्हटले आहे. या विधानानंतर काँग्रेस पक्षाकडून राजकुमार सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

रज्जू यांनी माफिया अतिकशी संबंधित वक्तव्याबाबत ही कारवाई केल्याचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मिश्रा अंशुमन यांनी सांगितले. तसेच हे रज्जू यांचे वैयक्तिक वक्तव्य असून, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही, असेही सांगितले. शिस्तभंगाची कारवाई करत पक्षाने रज्जू यांची नगरसेवकपदाची उमेदवारीही मागे घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.