उत्तर प्रदेशातील संभलमध्ये काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी 'जयश्री राम' यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभलमध्ये काँग्रेस नेते रशीद अल्वी (Congress leader Rashid Alvi) यांनी 'जयश्री राम' यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे. रशीद अल्वी यांचा केवळ 10 सेकंदांचा व्हिडिओ शेअर करून हिंदूविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांनी केलाय. मात्र, अल्वी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
संभलमधील (उत्तर प्रदेश) एका कार्यक्रमात काँग्रेस नेते रशीद अल्वी म्हणाले, आजकाल जयश्री राम बोलणारे काही लोक संत नसून राक्षस आहेत. या विधानापूर्वी रशीद अल्वी यांनी रामायणातील घटनेचा संदर्भ दिलाय. जेव्हा प्रभू हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमाचलला जात होते आणि वाटेत त्यांना संताच्या वेशात आलेल्या राक्षसानं गाठत हनुमानाला रोखण्याचा प्रयत्न केला होता, असं त्यांनी नमूद केलंय.
काय आहे रशीद अल्वीचं विधान?
भाजप नेते प्रशांत उमराव यांच्यासह अनेकांनी काँग्रेस नेते रशीद अल्वी यांच्या 10 सेकंदांच्या विधानाचा काही भाग शेअर केलाय. त्यात ते म्हणत आहेत, भारतात रामराज्य आलं पाहिजं; पण रामराज्यात द्वेषाला जागा नाही, रामराज्यात द्वेष कसा असू शकतो? आजकाल काही लोक जयश्री रामाचा जयघोष करून लोकांची दिशाभूल करत आहेत. अशा लोकांशी आपण हुशारीनं वागलं पाहिजे.
रामायणातील एका प्रसंगाचा संदर्भ देत अल्वी पुढे म्हणाले, जेव्हा हनुमानजी संजीवनी बुटी घेण्यासाठी हिमालयात जात होते, तेव्हा संताच्या वेशात एक राक्षस जयश्री राम-जयश्री राम म्हणत हनुमाना जवळ पोहोचला. त्यानंतर हनुमानाला त्या राक्षसानं स्नान केल्याशिवाय जयश्रीराम म्हणता येणार नाही, असं सांगितलं. तरीही बरेच लोक स्नान केल्याशिवाय जयश्रीराम बोलतात. तद्नंतर हनुमान आंघोळ करायला तिथे गेले असता, एका शापित मगरीनं त्यांना पकडलं, त्या मगरीला मोक्ष मिळाला आणि त्या संताच्या वेशात आलेल्या राक्षसानं त्याची सत्यता हनुमानाला सांगितली.
आजही अनेक लोक जयश्री रामचा नारा लावतात, ते संन्यासी नाहीत, तर राक्षस आहेत. अल्वी यांचं हे विधान ट्विटरवर चांगलंच व्हायरल होत आहे. यानंतर रशीद अल्वी यांनी स्पष्टीकरणही दिलंय. एका वृत्त वाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते रशीद अल्वी म्हणाले, 'माझ्या भाषणावेळी शेकडो साधू-संत तिथे बसले होते. जय श्रीराम बोलणारा प्रत्येक माणूस राक्षस असतो, असं मी कधीच म्हटलं नाही. राम कोणी साधू नाही, तर श्रीराम हे एका श्रद्धेचं नाव आहे, त्याच्यावर राजकारण करता येत नाही, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.