Sangli Lok Sabha 2024: सांगली लोकसभेबाबत काँग्रेस श्रेष्ठींचा श्रद्धा व सबुरीची सल्ला, विश्वजीत कदमांना ठोस आश्वासन नाही

Sangli Lok Sabha 2024: काँग्रेस अध्यक्षांनी या प्रश्नाबाबत प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस प्रभारींशी चर्चा करावी, असे सांगून आपले अंग काढून टाकले आहे.
Sangli Lok Sabha 2024
Sangli Lok Sabha 2024esakal
Updated on

Sangli Lok Sabha 2024

नवी दिल्ली: सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करणारे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे केलेली शिष्टाई फार सफल झालेली नाही. काँग्रेस अध्यक्षांनी या प्रश्नाबाबत प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस प्रभारींशी चर्चा करावी, असे सांगून आपले अंग काढून टाकले आहे.

महाविकास आघाडीमध्ये सांगली हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेलेला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने हिंद केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मात्र हा मतदारसंघ परंपरागत काँग्रेसचा असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला पाहिजे, असा दावा केला आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी दिल्लीत येऊन त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. या मतदारसंघात काँग्रेसचे संघटन कसे मजबूत आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.

परंतु काँग्रेसश्रेष्ठींनी कोणतेही ठोस आश्वासन दिले होते. श्रद्धा व सबुरी राखा, असे डॉ. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांना सांगण्यात आले होते. पुन्हा या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी दिल्ली गाठली व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व खासदार के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली.

सांगलीबाबत काँग्रेस श्रेष्ठींच्या मतामध्ये कोणताही बदल झालेला नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घ्यावी, असा सल्ला दिला. या नेत्यांना पुन्हा श्रद्धा व सबुरीचा सल्ला मिळाल्याने त्यांनी तडक नागपूर गाठले व प्रदेशाध्यक्ष व प्रदेश प्रभारींची भेट घेतली. सांगलीत तिसर्या टप्प्यात येत्या 7 मे रोजी मतदान आहे. येत्या 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे.

Sangli Lok Sabha 2024
Shrikant Shinde on Ganpat Gaikwad: उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांवर हल्लाबोल; म्हणाले, गुंड प्रवृत्ती...

शिवसेनेची बाजू मजबूत-

जागावाटपाच्या चर्चेत सांगली जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी केलेला युवक्तीवाद अधिक मजबूत असल्याचे काँग्रेसश्रेष्ठींचे मत असल्याचे समजते. शिवसेनेच्या दोन विद्यमान जागा काँग्रेसने आपल्याकडे घेतल्या आहेत. यात कोल्हापूर व रामटेक या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या इच्छेनुसार ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. काँग्रेसकडून लढण्याची छत्रपती शाहू महाराजांची इच्छा शिवसेनेने मान्य केली.

रामटेकमध्ये शिवसेनेकडे जागा योग्य उमेदवार नसल्याने आमदार सुनील केदार यांच्या प्रभावामुळे हा मतदारसंघही काँग्रेसकडे आला. यामुळे शिवसेनेला दोन विद्यमान खासदारांच्या बदल्यात काँग्रेसकडून एक जागा घेणे आवश्यक होते.

गेल्या निवडणुकीत सांगलीत काँग्रेसचा उमेदवारच नव्हता. यामुळे सेनेची बाजू अधिक मजबूत झाली. यापूर्वी 2014 मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ नाही. यामुळे किमान सांगली मिळावा, हा शिवसेनेचा दावा आहे.

Sangli Lok Sabha 2024
Neelam Gorhe: भाजपने उमेदवार बदलण्यास भाग पाडले का? नीलम गोऱ्हेंनी स्पष्ट सांगितलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.