सचिन पायलट आणि सारा अब्दुल्ला यांचा घटस्फोट; निवडणूक शपथपत्रातून आलं समोर

 Sachin Pilot and Sara Abdullah
Sachin Pilot and Sara Abdullah
Updated on

नवी दिल्ली- राजस्थानमधील काँग्रेसचे प्रमुख नेते सचिन पायलट आणि त्यांच्या पत्नी सारा अब्दुल्ला यांचा जवळपास दोन दशकानंतर घटस्फोट झाला आहे. राजस्थानमध्ये पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

निवडणुकीसाठीच्या शपथपत्रामध्ये सचिन पायलट यांनी आपला घटस्फोट झाल्याची माहिती भरली आहे. त्यामुळे ही माहिती उघड झाली.(Congress leader Sachin Pilot and Sara Abdullah have separated after nearly two decades of marriage revealed in election affidavit)

 Sachin Pilot and Sara Abdullah
Vidahsabha Election: राजस्थान निवडणुकीचा प्रचार चक्क कोल्हापुरात, काँग्रेसचे आमदार पोहचले जैन समाजाच्या भेटीला

सचिन पायलट (वय ४६) यांचा घटस्फोट झाल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. त्यांच्या माजी पत्नी सारा अब्दुल्ला या जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या मुलगी आहेत. सचिन पाललट आणि सारा यांचे २००४ मध्ये लग्न झाले होते. त्यांना आर्यन आणि वेहान नावाची दोन मुलं आहेत.

विशेष म्हणजे पायलट आणि सारा यांचा प्रेम विवाह झाला होता. परदेशात शिक्षण घेत असताना त्यांचे सूत जुळले होते. घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या घटस्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सचिन पायलट यांनी आपली दोन मुलं आपल्यावर अवलंबून असल्याचं शपथपत्रात म्हटलं आहे.

 Sachin Pilot and Sara Abdullah
Rajasthan Election : राजस्थान विधानसभेत काँग्रेस बाजी मारणार? पक्षाचा मास्टर प्लॅन आला समोर

पायलट यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. २००८ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ३.८ कोटी इतकी होती. २०२३ मध्ये त्यांची संपत्ती वाढून ७.५ कोटी झाली आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निकाल ३ डिसेंबरला लागेल. सचिन पायलट टोंक मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.