इतिहासाची 57 वर्षांनी पुनरावृत्ती! इंदिरा गांधी यांच्यानंतर कुटुंबाचा 'हा' सदस्य राज्यसभेत जाणार

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Sonia Gandhi Indira Gandhi
Sonia Gandhi Indira Gandhiesakal
Updated on
Summary

सोनिया गांधी यांची राज्यसभेत नियुक्ती झाल्यानंतर रायबरेली या मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक रिंगणात येण्याची शक्यता वाढली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज राजस्थानमधून राज्यसभेसाठी (Rajyasabha Election) उमेदवारी दाखल केल्यानंतर पन्नास वर्षांनंतर गांधी कुटुंबाचा कुणी सदस्य राज्यसभेत जाणार आहे. यापूर्वी इंदिरा गांधी (Indira Gandhi) राज्यसभेच्या सदस्य होत्या.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून त्या सातत्याने उत्तर प्रदेशातील रायबरेली या मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेल्या आहेत. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आता लोकसभा निवडणूक (Loksabha Elections) लढविण्यापेक्षा राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Sonia Gandhi Indira Gandhi
अशोक चव्हाणांच्या भाजपप्रवेशाने काँग्रेस-राष्ट्रवादीत धाकधूक; 'या' नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

या निर्णयामुळे तब्बल ५७ वर्षांनंतर गांधी कुटुंबातील (Gandhi Family) कुणी सदस्य राज्यसभा सदस्य होणार आहे. यापूर्वी इंदिरा गांधी या १९६४ ते १९६७ या काळात राज्यसभेवर सदस्य होत्या. त्यानंतर गांधी कुटुंबातील प्रत्येक सदस्य लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचले आहेत.

Sonia Gandhi Indira Gandhi
Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकरांच्या जिभेवर सरस्वती आहे; असं का म्हणाले भाजप नेते?

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचे निधन झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधानपदी निवड झाली. यावेळी १९६४ मध्ये इंदिरा गांधी यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. त्यांनी माहिती व नभोवाणी मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला होता. परंतु त्यावेळी त्या लोकसभा किंवा राज्यसभेच्या सदस्य नव्हत्या. सहा महिन्याच्या आत संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाच्या सदस्य होणे आवश्यक असल्याने त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली होती. त्यांची पहिल्यांदा १९६६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदी निवड झाली तेव्हा त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या.

१९६७ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी रायबरेली हा मतदारसंघ निवडला. याच मतदारसंघातून फिरोज गांधी लोकसभेत निवडून गेले होते. तेव्हापासून रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. १९६७ नंतर मात्र गांधी कुटुंबाचा एकही सदस्य राज्यसभेचा सदस्य झाला नव्हता. आता जवळपास ५७ वर्षांनंतर सोनिया गांधी यांची नियुक्ती राज्यसभेवर होणार आहे.

Sonia Gandhi Indira Gandhi
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी महत्त्वाची बातमी; साताऱ्यात 'सेफ हाउस'ची निर्मिती, काय आहे खासियत?

प्रियंका गांधींवर रायबरेलीची जबाबदारी

सोनिया गांधी यांची राज्यसभेत नियुक्ती झाल्यानंतर रायबरेली या मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक रिंगणात येण्याची शक्यता वाढली आहे. त्या काही वर्षांपासून पक्षाच्या स्टार प्रचारक असल्या तरी निवडणुकीच्या आखाड्यात त्यांनी अद्याप पाऊल टाकलेले नाही. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहे. राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव झाल्यानंतर प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून उतरविण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठी घेण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()