Rahul Gandhi यांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापून टाकू; काँग्रेस नेत्याची थेट धमकी

या प्रकरणी मणिकंदन यांच्याविरुद्ध आयपीसी 153B सह तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Dindigul Congress President Manikandan
Dindigul Congress President Manikandanesakal
Updated on
Summary

सुरतच्या CJM न्यायालयानं राहुल यांना 2019 मध्ये 'मोदी आडनावा'बाबत केलेल्या टिप्पणीप्रकरणी कलम 504 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

दिंडीगुलचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मणिकंदन (Dindigul Congress President Manikandan) यांचा गुरुवारी आंदोलनादरम्यान संयम सुटला.

राहुल गांधींना (Rahul Gandhi) शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाची (Judge) जीभ कापण्याची धमकी त्यांनी दिली. आम्ही सत्तेत आल्यावर राहुल गांधींना तुरुंगात पाठवण्याचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापून टाकू, अशी धमकी त्यांनी 6 एप्रिल रोजी आंदोलनादरम्यान दिली होती.

मणिकंदन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

दिंडीगुल पोलिसांनी (Dindigul Police) सांगितलं की, या प्रकरणी मणिकंदन यांच्याविरुद्ध आयपीसी 153B सह तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.

Dindigul Congress President Manikandan
Varanasi : उपमुख्यमंत्र्यांच्या भावासोबत गैरव्यवहार; सामानासकट हॉटेलमधून हाकलून दिलं

तामिळनाडूतील दिंडीगुल इथं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अपात्रतेच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. यादरम्यान जिल्हाप्रमुख मणिकंदन म्हणाले, 23 मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यावेळी त्यांनी न्यायमूर्ती एच वर्मा यांना उद्देशून म्हटलं, जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा आम्ही तुमची जीभ कापून टाकू, अशी धमकी दिली.

Dindigul Congress President Manikandan
Arvind Kejriwal : आता केजरीवालांच्या अडचणी वाढणार; सुकेशचा 700 पेजच्या 'चॅट'बाबत मोठा गौप्यस्फोट

काय आहे प्रकरण?

23 मार्च रोजी सुरतच्या CJM न्यायालयानं राहुल यांना 2019 मध्ये 'मोदी आडनावा'बाबत केलेल्या टिप्पणीप्रकरणी कलम 504 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, न्यायालयानं या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकातील कोलार इथं एका सभेत राहुल गांधी म्हणाले होते, 'सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे?' या संदर्भात भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर राहुल गांधींना सुरत कोर्टातून जामीन मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.