Operation Hasta : JDS चे आमदार फुटणार? 'ऑपरेशन हस्त'पासून वाचण्यासाठी 19 आमदारांना हलविलं हासनच्या रिसॉर्टवर!

काही दिवसांपूर्वी धजदने भाजपसोबत युती केली आहे.
Congress leaders Operation Hasta
Congress leaders Operation Hastaesakal
Updated on
Summary

काँग्रेसने धजदच्या नाराज आमदारांसाठी सापळा रचला आहे.

बंगळूर : विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election) दारुण पराभव पत्करावा लागलेल्या धजदला आपल्या १९ आमदारांना सांभाळणे एक डोकेदुखी झाली आहे. काँग्रेस (Congress) नेत्यांच्या ‘ऑपरेशन हस्त’पासून (Operation Hasta) आमदारांना वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री व धजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) रणनीती आखत आहेत.

हासनच्या रिसॉर्टमध्ये आपल्या आमदारांना नेऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपूर्वी धजदने भाजपसोबत युती केली आहे. कुमारस्वामी यांनी आपला पक्ष वाचवण्यासाठी ही युती आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले होते, मात्र धजदच्या आमदारांचे युतीबाबत वेगळे मत आहे.

Congress leaders Operation Hasta
BJP Politics : भाजपनं 'या' पक्षासोबत केली युती; नाराज झालेल्या माजी केंद्रीय मंत्र्यानं राजकारणातून घेतली तडकाफडकी निवृत्ती

देवदुर्गच्या आमदार करेम्मा, गुरुमितकललचे आमदार शरणगौडा कंदकूर यांनी युतीबाबत आधीच नाराजी व्यक्त केली आहे. ही युती आमदारांसाठी नाखूष असली तरी ज्येष्ठांच्या शब्दाला किंमत देऊन त्यांना युतीसाठी राजी व्हावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, काँग्रेसने धजदच्या नाराज आमदारांसाठी सापळा रचला आहे. याशिवाय, विद्यमान आमदारही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या वक्तव्यामुळे धजद नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

युतीच्या निर्णयानंतर शरणगौडा यांनी कंदकूर पक्षापासून अंतर ठेवले आहे. मतदारसंघातील राजकीय भवितव्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. धजद कार्यालयात नुकत्याच झालेल्या आमदारांच्या बैठकीलाही ते अनुपस्थित होते. मात्र देवदुर्गाच्या आमदार करेम्मा बैठकीत दिसून आल्या. कंदकूरची पुढची चाल काय आहे, त्याची उत्सुकता वाढली आहे.

Congress leaders Operation Hasta
काँग्रेसची सत्ता जाणार? कर्नाटकात 15 नोव्हेंबरला मोठा राजकीय भूकंप, शिवकुमार-कुमारस्वामींच्या दाव्याने खळबळ

सिद्धरामय्या यांच्यावर टीका

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना कुमारस्वामी यांनी चोरीचे हुब्लॉट घड्याळ घालून शो करणारे तुम्ही माझ्याबद्दल बोलत आहात का? असा प्रश्न करून विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कुमारस्वामींनी जे केले नाही, त्याबद्दल काही लोक बोलतात. मात्र, मी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. मी मंड्यातील ७५० कोटींचे कर्ज माफ केले आहे. तुमच्या सरकारच्या काळातही तुमच्या नेत्यांनी कर्जमाफी करावी. कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडून झाले. आता शेतकऱ्यांच्या जगण्यासाठी हे तरी करा, असा आग्रह कुमारस्वामी यांनी धरला. या राज्यासाठी मी काय केले, काय योगदान दिले याच्या नोंदी आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘‘कुमारस्वामी सरकारचा कारभार कसा होता, सिद्धरामय्या यांचा कारभार कसा होता, हे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना विचाराल, तर ते तुम्हाला रेकॉर्ड देतील. अधिकाऱ्यांना कठोर परिश्रम करण्यास सांगा. तुम्ही म्हणताय फक्त पिकाचं नुकसान झालंय. भरपाईचा विचार केला आहे का? पीक विम्याबाबत काही कार्यवाही केली आहे का? विरोधकांचे काम काय असते हे आम्हाला तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम करा.’’

Congress leaders Operation Hasta
Raju Shetti : हसन मुश्रीफांचं 'ते' चॅलेंज राजू शेट्टींनी स्वीकारलं; म्हणाले, मी पुराव्यानिशी ते जाहीर करणार..

आमदार कंदकूर गळाला?

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी आपल्या आमदारांना हासनच्या खासगी रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवले आहे. ते आमदारांशी चर्चा करत आहेत. मात्र १९ पैकी केवळ १८ आमदार बैठकीला उपस्थित होते. युतीवर नाराजी व्यक्त करणारे गुरुमिटकल्लचे आमदार शरणगौडा कंदकूर अनुपस्थित आहेत. अर्थात त्याची अनुपस्थिती हे कुतूहल वाढवणारे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.