लशीवरुन राजकारणः काँग्रेस नेते म्हणाले, आधी PM मोदी आणि भाजप नेत्यांनी लस घ्यावी

pm modi.png
pm modi.png
Updated on

पाटणा- कोरोना विषाणूच्या लशीवरुन देशात सध्या राजकीय शेरेबाजीला ऊत आला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेस नेते राशिद अल्वी यांच्यानंतर आता बिहार काँग्रेसचे आमदार अजित शर्मा यांनी सरकारसमोर एक नवीन मागणी केली आहे. भागलपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेतील आमदारांचे गटनेते अजित शर्मा यांनी पंतप्रधान मोदी यांना कोरोनाची पहिली लस दिली जावी अशी मागणी केली आहे. यामुळे लोकांच्या मनात लशीबद्दल विश्वास वाढेल, असे ते म्हणाले. 

अजित शर्मा म्हणाले की, जसं अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वतः लस घेतली. त्याचपद्धतीने पंतप्रधान मोदींनी कोरोनाची लस सर्वात आधी घ्यावी. म्हणजे जनतेमध्ये लशीबाबत विश्वास वाढेल. त्याचबरोबर ज्या दोन कंपन्यांना लशीची परवानगी मिळाली. त्या काँग्रेस काळात स्थापन करण्यात आल्या होत्या, असे सांगत त्यांनी काँग्रेसला लशीचे श्रेय दिले. 

तर दुसरीकडे मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचे भाऊ आणि चाचौडा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सिंह यांनीही अशाच पद्धतीची मागणी करणारे टि्वट केले. ते म्हणाले की, कोविड लशीबाबत अनेक शंका आहेत. अशावेळी पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांना ही लस देणे चांगले होईल. सर्व ठीक झाले तर जनताही लस टोचून घेईन. 

देशात दोन कंपन्यांच्या कोरोना लशींना आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. ज्यामध्ये सीरम इन्सिट्ट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या कोरोना लशींचा समावेश आहे. मंजुरी मिळाल्यानंतर यावरुन वेगवेगळी वक्तव्ये समोर येत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपची लस सांगत ती घेण्यास नकार दिला होता. तर आनंद शर्मा, शशी थरुर आणि जयराम रमेश यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांनी मर्यादित वापरासाठी भारत बायोटेकच्या कोविड-19 च्या लशीला दिलेल्या मंजुरीवर प्रश्न उपस्थित केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.