गोवा काँग्रेसमध्ये फूट, मायकल लोबोंना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवलं

Michael Lobo immediately removed from the position of Leader of Opposition of goa politics
Michael Lobo immediately removed from the position of Leader of Opposition of goa politics
Updated on

पणजी : सध्या गोव्यातील राजकीय क्षेत्रात घडामोडींना वेग आला असून, कॉंग्रेसचे नेते मायकेल लोबो यांची गोव्याच्या विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. AICC गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान ते पुढे म्हणाले, काँग्रेस फोडण्यासाठी किती पैसा फेकला हे मी सांगू शकत नाही, असा घणाघाती आरोपही दिनेश गुंडू राव यांनी भाजपवर केला आहे. (Michael Lobo immediately removed from the position of Leader of Opposition of goa politics)

काँग्रेसमधले ९ विद्यमान आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी १० जुलै २०१९ ला कॉंग्रेसचे १० आमदार भाजपात (Bhartiya Janata Party) सामील झाले होते. आज बरोबर तीन वर्षांनंतर याच घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गोव्यात काँग्रेस आमदारांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या भूमिकेची चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची तत्काळ प्रभावाने विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

एआयसीसीचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले की, आमच्या काही नेत्यांनी गोव्यातील काँग्रेस पक्ष कमकुवत करण्यासाठी आणि पक्षांतर करण्याचा प्रयत्न भाजपसोबत केला होता. या कटाचे नेतृत्व आमचेच दोन नेते एलओपी मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांनी केले.

दरम्यान गोव्याचे कॉंग्रेस प्रभारी राव यांनी नवा नेता निवडला जाईल. तसेच पक्षांतराच्या विरोधात कायद्याने जी काही कारवाई करावी लागेल. किती लोक राहतील किंवा जातील ते पाहू. सध्या आमचे ५ आमदार येथे आहेत, आम्ही आणखी काही आमदारांच्या संपर्कात आहोत आणि ते आमच्यासोबत असतील असे त्यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस पक्ष निराश होणार नाही, कमकुवत होणार नाही. हा मुद्दा आम्ही अधिक आक्रमकपणे मांडू, सत्तेसाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी 2 जणांनी केलेला हा विश्वासघात आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू असेही ते यावेळी म्हणालेत. गोव्यात काँग्रेसचे केवळ 11 आमदार आहेत. यापैकी 9 भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसकडे केवळ दोनच आमदार उरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.