मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपले सरकार पाडण्यासाठी भाजप काँग्रेसच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर देत असल्याचा दावा केला होता.
बेळगाव : राज्यात काँग्रेस (Congress) पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून ‘ऑपरेशन कमळ’ (Operation Lotus) राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या हालचाली आजही सुरू आहेत आणि भविष्यातही सुरू राहतील, अशी खळबळजनक माहिती काँग्रेसचे कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी दिली.