Punjab : कॅबिनेट मंत्र्यांसह खासदार-आमदार भाजपात करणार प्रवेश?

Punjab Assembly Election
Punjab Assembly Electionesakal
Updated on
Summary

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.

Punjab Assembly Election : पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका (Punjab Assembly Election) होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पंजाबातील वातावरण चांगलाच तापलंय. वास्तविक, काँग्रेस सरकारमधील (Congress Government) अनेक मंत्री, खासदार आणि आमदार 2022 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. येत्या काही दिवसांत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून राज्यात भाजपची (BJP) ताकद वाढणार असल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबातील अनेक खासदार, कॅबिनेट मंत्री, आमदारांसह अनेक नामवंत व्यक्ती भाजपच्या संपर्कात आहेत. यात बहुतांश काँग्रेसचे लोक सामील असल्याचं बोललं जातंय. तसेच आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party), शिरोमणी अकाली दल (Shiromani Akali Dal) आणि राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसचे लोकही भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवाय, पुढील आठवड्यात चार पंजाबी गायकही भाजपसोबत हातमिळवणी करू शकतात.

Punjab Assembly Election
राज्यातील 105 नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान

काँग्रेसचं का होणार नुकसान?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांचा राजीनामा आणि काँग्रेसमधून बाहेर पडणं, हे या बदलाचं मूळ कारण असल्याचं मानलं जातंय. यापूर्वी कॅप्टन अमरिंदर यांनी त्यांचा नवीन पक्ष पंजाब लोक काँग्रेसची स्थापन केली. त्यानंतर भाजपनं कॅप्टन अमरिंदर यांच्या पक्षासोबत युती करून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

Punjab Assembly Election
KMC Election Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या TMC ची जोरदार मुसंडी

117 जागांवर होणार निवडणूक

पंजाबमधील 117 जागांपैकी भाजप 80-85 जागांवर निवडणूक लढवू शकते. कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पक्ष 20 ते 25 जागांवर निवडणूक लढवू शकतो, तर काही जागा सुखदेव सिंह ढींढसा यांच्या पक्षाला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.