हिंदू नाव देखील विदेशी लोकांनी दिलं, तेही बदलणार का? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा मोदी सरकारला सवाल

rahul gandhi pm narendra modi
rahul gandhi pm narendra modisakal
Updated on

नवी दिल्ली- केंद्र सरकारने इंडिया नावाचा त्याग करण्याकडे पाऊल उचललं आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया याच्या जागी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख सरकारने करण्यास सुरुवात केली आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकार याबाबत विधेयक आणणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी सरकारवर टीका केली. (congress MP Adhir Ranjan Chowdhury says, "The Hindu name is also given by foreign countries)

सरकारला ब्रिटिंशांनी किंवा बाहेरुन आलेल्या नावांचा इतका द्वेष असेल तर त्यांनी हिंदू नावाचाही त्याग करावा, असं ते म्हणाले आहेत. हिंदू नाव देखील विदेशी लोकांनी दिलं आहे. अरबी आणि इराणी लोक यांनी आपल्याला हिंदू नाव दिलं. त्यांना इंदू म्हणता येत नव्हतं, त्यामुळे ते हिंदू म्हणायचे. इंदूस म्हणजे सिंधू नदीच्या पूर्वेच्या भागात राहणाऱ्या लोकांचा हिंदूस्तान असं म्हणलं जायचं. त्यामुळे हिंदू नाव देखील येथील नाही. विदेशी लोकांनी ते दिलं आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

rahul gandhi pm narendra modi
Bharat Vs India Memes : 'इंडिया'चे नामकरण 'भारत' झाल्यास कुणाची नावं कशी असतील? नेटकऱ्यांच्या 'क्रिएटिव्हिटी'ला तोड नाय!

इतिहासाकडे पाहिलं तर आपल्याला कळून येईल की अनेक नावे बाहेरुन आलेले आहेत. रिपब्लिक ऑफ भारत असं नाव तुम्ही का वापरत आहात. रिपब्लिक ही देखील ब्रिटिशांची भाषा आहे. भारताचे महामहीम असं तुम्ही का म्हणत नाही? इंडिया नावारुन मोदी सरकार घाबरले आहेत. इंडिया नावाची आघाडी बनल्यापासून मोदींचा विरोधकांवरील द्वेष वाढला आहे, अशी टीका त्यांनी केली.

rahul gandhi pm narendra modi
INDIA Alliance : मोदी सरकारकडून राज्यघटनेतून 'इंडिया' शब्द हटवण्याची चर्चा; वडेट्टीवारांची तिखट प्रतिक्रिया

इंडियन मुजाहिद्दीन, ईस्ट इंडिया अशी टीका आमच्यावर मोदी करत आहेत. इतकीच इंग्रजांची गुलामी वाईट वाटत असेल तर राष्ट्रपती भवनचा त्यांनी त्याग करावा. कारण, राष्ट्रपती भवन व्हॉईसरॉयचे निवासस्थान होते. लॉर्ड आयर्विन, माऊंटबॅटेन हे त्याठिकाणी राहायचे. नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचा मोदी सरकारने त्याग करावा. इतकाच तिटकारा असेल तर सगळं बॉम्बने उडवून टाकावं, अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.