नवी दिल्ली- प्रधान मंत्री किसान संपदा योजनेंतर्गत (PMKSY) १० कोटींचे अनुदान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या कुटुंबियांना मंजूर झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने 'एक्स'वर गोगोई यांचं पत्र शेअर केले आहे.(Congress MP Gaurav Gogoi writes to Union Minister Piyush Goyal)
गोगोई यांनी गोयल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की, तुमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे पत्र मी लिहित आहे. प्रधान मंत्री किसान संपदा योजनेंतर्गत १० कोटींचे अनुदान आसाम मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले आहे.
अन्न प्रक्रिया मंत्रालयाने प्रधान मंत्री किसान संपदा योजनेंतर्गत अग्रो क्लस्टर निर्मितीसाठी १० कोटी रुपये अनुदान मंजूर केलं होतं. एम/एस प्राईड ईस्ट इंटरटेनमेंटला हे अनुदान मंजूर करण्यात आले असून या कंपनीचे प्रोमोटर श्री रिनिकी भुयान शर्मा यांच्याकडे आहे. या मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या पत्नी आहेत, असा उल्लेख पत्रात आहे.
आसाममध्ये गुंतवणुकीसाठी काही पाऊलं उचलली का? या प्रश्नावर उत्तर देताना वाणिज्य मंत्रालयाने एक यादी जाहीर केली होती. यावर आसाममध्ये अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी PMKSY योजनेतंर्गत अनुदान देण्यात आलेल्या कंपन्यांची नावे देण्यात आली होती. यामध्ये एम/एस प्राईड ईस्ट इंटरटेनमेंट या कंपनीचाही समावेश होता, असं गोगोई म्हणाले.
यादीमध्ये सातव्या क्रमांवर या कंपनीचे नाव होते. याला १० कोटी अनुदान देण्यात आले आहे. सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या वेबसाईटवर याची माहिती उपलब्ध आहे. शर्मा यांनी सरकारकडून कोणतीही रक्कम घेतली नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे जेणेकरुन सत्य बाहेर येईल, अशी मागणी गोगोई यांनी पत्रात केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.