Preneet Kaur : कॅप्टन अमरिंदर सिंग यांना झटका; खासदार पत्नी प्रनीत कौर यांचे काँग्रेसकडून निलंबन

Preneet Kaur
Preneet KaurSakal
Updated on

Preneet Kaur Suspended From Congress Party : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि खासदार प्रनीत कौर यांना काँग्रेस पक्षाने पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली निलंबित केले आहे.

प्रनीत कौर पंजाबच्या पटियाला येथून काँग्रेसच्या लोकसभा खासदार आहेत. प्रनीत कौर यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, त्यांना पक्षातून बाहेर का काढू नये असा प्रश्न विचारत याचे तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

Preneet Kaur
Amravati Graduate Constituency Result : अमरावतीतही भाजपचा सुपडा साफ; मविआचे धीरज लिंगाडे विजयी

प्रणीत कौर यांना काँग्रेसमधून काढून टाकण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. पक्षाच्या बैठकीत यासंदर्भातील ठरावही मंजूर करण्यात आला होता.

तर, पंजाब निवडणुकीपूर्वीच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. कौर यांचा पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा पंजाब काँग्रेसने यापूर्वी केला होता.

Preneet Kaur
Sanjay Raut : पत्राचाळप्रकरणी राऊतांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

कॅप्टन म्हणून ओळखले जाणारे सिंग हे २००२ ते २००७ आणि मार्च २०१७ ते सप्टेंबर २०२१ या काळात पंजाबचे मुख्यमंत्री होते. नंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले. यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि नंतर पीएलसीची स्थापना केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी पीएलसी पक्ष भाजपमध्ये विलीन केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.