Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी पदयात्रा केली रद्द; म्हणाले, माझ्यासाठी खूप कठीण..

जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या सुरक्षेतील त्रुटीमुळं काझीगुंडजवळ आज भारत जोडो यात्रा थांबवण्यात आली.
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra postponed
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra postponed esakal
Updated on
Summary

'माझे सहकारी चालताना अस्वस्थ झाले. या कारणास्तव मी ही पदयात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, माझे इतर सहकारी अजूनही चालत आहेत.'

काझीगुंड : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात (Jammu and Kashmir Anantnag) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आलीये.

सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचं सांगत राहुल गांधी म्हणाले, 'पोलीस यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस आम्हाला कुठेच दिसत नाहीत. माझे सहकारी चालताना अस्वस्थ झाले. या कारणास्तव मी ही पदयात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, माझे इतर सहकारी अजूनही चालत आहेत.'

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra postponed
Surgical Strike Row: 'सर्जिकल स्ट्राइक'चा वाद पेटला; काँग्रेसनं भाजपकडं मागितला 'हा' पुरावा, सरकारच्या भूमिकेकडं लक्ष

काँग्रेस नेत्यानं सांगितलं की, पोलिसांनी गर्दी हाताळण्यासाठी व्यवस्था करणं महत्वाचं होतं, जेणेकरून आम्हाला प्रवास करता येईल. माझ्या सुरक्षा कर्मचार्‍यांच्या सल्ल्याविरुद्ध जाणं माझ्यासाठी खूप कठीण होतं, म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra postponed
PM मोदींच्या 'त्या' सल्ल्याचा परिणाम! 'पठाण'बाबत भाजप नेत्याचा बदलला सूर; गृहमंत्री म्हणाले, आता विरोध..

जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या सुरक्षेतील त्रुटीमुळं काझीगुंडजवळ आज भारत जोडो यात्रा थांबवण्यात आली. जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रभारी रजनी पाटील यांनी ट्वीट केलं की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला सुरक्षा पुरवण्यात जम्मू-काश्मीर प्रशासन अपयशी ठरलंय. यातून सुरक्षेबाबत प्रशासनाची अयोग्य वृत्ती दिसून येते, असं त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी आज 11 किलोमीटर चालणार होते, पण केवळ 500 मीटर चालल्यानंतर त्यांना थांबावं लागलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.