चंदीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता लुधियानाचे काँग्रेस (Congress) खासदार रवनीत सिंह बिट्टू (Ravneet Singh Bittu) यांना व्हॉट्सॲपवर ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. मंगळवारी त्यांना आलेल्या मेसेजमध्ये ‘सिद्धू मुसेवाला सारखेच हाल केले जातील’ असे म्हटले आहे. बिट्टू यांच्या वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धमकीला दुजोरा दिला आहे. (Congress MP Ravneet Singh Bittu threatens to kill)
सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर आठ शार्पशूटर्सनी गोळीबार केला होता. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी हेही सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांना भेटायला आले होते. मुसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या आठ शार्पशूटरपैकी तीन पंजाबचे असल्याचे सांगण्यात येत होते. याशिवाय हरयाणा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन आणि राजस्थानमधील एक आहे.
मुसेवाला यांच्या हत्येच्या एक दिवस आधी भगवंत मान सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली होती. खासदार रवनीत सिंह बिट्टू (Ravneet Singh Bittu) यांच्या शिवाय बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही धमकीचे (threat) पत्र आले होते. या पत्रात लिहिले होते, सलमान खान, सलीम खान लवकरच तुमचा मुसेवाला होणार आहे.
धमकीच्या (threat) पत्रात जीबी आणि एलबीचा वापर गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई असा केला जात आहे. लॉरेन्स बिश्नोई हा मुसेवाला हत्याकांडातील मुख्य आरोपी असल्याचे मानले जात आहे. मात्र, लॉरेन्स बिश्नोईने सलमानला पाठवलेल्या पत्राशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.