मोठी बातमी! काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचं निधन; भारत जोडो यात्रेत आला हृदयविकाराचा झटका

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे.
congress mp santokh singh chaudhary died
congress mp santokh singh chaudhary diedesakal
Updated on
Summary

संतोख यांनी 2014 आणि 2019 मध्ये जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये (Punjab) आहे. काही वेळापूर्वी पदयात्रेत सहभागी असलेले काँग्रेस खासदार संतोख सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती खालावल्याचं पाहून त्यांना तातडीनं फगवाडा येथील विर्क रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

इथं त्यांच्यावर काही काळ उपचार सुरू होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला आहे. संतोख सिंह काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानं राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा थांबवली आणि तात्काळ हॉस्पिटलला रवाना झाले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

congress mp santokh singh chaudhary died
संतापजनक! TV दाखवण्याच्या बहाण्यानं तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; 50 वर्षीय आरोपीला अटक

संतोख यांनी 2014 आणि 2019 मध्ये जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यांच्या निधनानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट केलं की, 'जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अकाली निधनानं मला खूप दुःख झालं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()