Sonia Gandhi : काँग्रेसनं 'या' दोन नेत्यांना सर्व पदांवरून हटवलं

Sonia Gandhi
Sonia Gandhiesakal
Updated on
Summary

दोन नेत्यांबाबत शिफारशी पाठवल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी हा निर्णय घेतलाय.

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर परस्पर मतभेदानं झगडणाऱ्या काँग्रेसनं (Congress Party) सुनील जाखड (Sunil Jhakhad) आणि पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष केव्ही थॉमस (KV Thomas) यांना सर्व पदांवरून हटवलं आहे. शिस्तपालन समितीनं केव्ही थॉमस, सुनील जाखड यांच्याबाबत शिफारशी पाठवल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी हा निर्णय घेतलाय.

शिस्तपालन समितीच्या अहवालानंतर, सोनिया गांधी यांनी केव्ही थॉमस यांना राज्य घडामोडी समिती आणि केपीसीसीच्या कार्यकारी समितीतून काढून टाकलंय. तर, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाचा निषेध केला होता. त्यामुळं त्यांनाही पदांवरुन काढून टाकण्यात आलंय.

Sunil Jhakhad and KV Thomas
Sunil Jhakhad and KV Thomas
Sonia Gandhi
राणा म्हणजे, देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेलं बुजगावणं : बच्चू कडू

काँग्रेसनं थॉमस यांना बजावली होती नोटीस

या प्रकरणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं (AICC) 11 एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस कमिटी सदस्य केव्ही थॉमस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. केव्ही थॉमस यांनी कन्नूर इथं आयोजित केलेल्या सीपीएम पक्षाच्या कार्यक्रमात पक्षाच्या सूचनेला न जुमानता सतत पक्षविरोधी वक्तव्य केल्याबद्दल त्यांना ही नोटीस देण्यात आली होती. एकीकडं काँग्रेसनं दोन नेत्यांना सर्व पदांवरून हटवलं, तर दुसरीकडं हिमाचल प्रदेशसाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी काँग्रेसनं प्रतिभा वीरभद्र सिंह यांची नियुक्ती केलीय. तसेच मुकेश अग्निहोत्री आणि सुखविंदर सिंग सुखू यांची अनुक्रमे CLP नेते आणि प्रचार समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.